वृत्तसंस्था
मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांनंतर सलमान खान नेहमीच कडक सुरक्षेत असतो. परंतु कडक सुरक्षा असूनही पहाटे 4.50 वाजता, दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.The firing outside Salman Khan’s house sparked excitement, the assailants fled on a two-wheeler after opening fire in the early hours of the morning
सलमानच्या घराबाहेर हवेत गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4.50 वाजता वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात लोकांनी हवेत तीन ते चार राउंड गोळीबार केला. दोन्ही शूटर बाईकवर आले आणि नंतर हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
सलमानची सुरक्षा वाढवली
गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळी कोणी चालवली हा अद्याप तपासाचा विषय आहे, मात्र सलमान खानला असलेला धोका लक्षात घेता त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सलमानला अनेकदा धमक्या आल्या
बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची बातमी येताच त्याचे चाहते प्रचंड तणावात आहेत. सलमानच्या सुरक्षेची सगळ्यांनाच चिंता आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमानवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबाराची बाब गंभीर आहे.
The firing outside Salman Khan’s house sparked excitement, the assailants fled on a two-wheeler after opening fire in the early hours of the morning
महत्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्यावर विजयवाडा येथे हल्ला; रोड-शो दरम्यान दगडफेक; कपाळाला मार
- माढात 2004 चा जुना प्रयोगच 2024 मध्ये करण्याची पवारांवर वेळ; नव्या दमाच्या चेहऱ्यांचा राष्ट्रवादीत बसेना मेळ!!
- ‘हेल्थ ड्रिंक्स’ श्रेणीतून बोर्नव्हिटा हटवा : केंद्राचा आदेश
- कंगना रणौतने काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा, म्हणाल्या…