• Download App
    लोकसभा अध्यक्ष पदाची लढत अटळ; NDA कडून ओम बिर्ला विरुद्ध INDI आघाडी कडून के. सुरेश यांचे अर्ज दाखल!! The fight for the post of Lok Sabha Speaker is inevitable

    लोकसभा अध्यक्ष पदाची लढत अटळ; NDA कडून ओम बिर्ला विरुद्ध INDI आघाडी कडून के. सुरेश यांचे अर्ज दाखल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेत 240 संख्येने असलेल्या विरोधकांच्या INDI आघाडीशी सत्ताधारी NDA आघाडीशी अखेर जमले नाहीच. लोकसभा अध्यक्ष पदाची लढत त्यामुळे अटळ बनली. NDA कडून ओम बिर्ला तर INDI आघाडी कडून के सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या लढतीसाठी अर्ज दाखल केले. The fight for the post of Lok Sabha Speaker is inevitable

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री किरण रिजू यांनी विरोधकांशी चर्चा करून लोकसभा अध्यक्ष पदाबाबत सहमती घडविण्याचा प्रयत्न केला. राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच बाकीच्या विरोधी नेत्यांची संपर्क साधला होता. त्यांच्याकडे त्यांनी लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सहकार्य मागितले होते. मात्र या संदर्भात आज सकाळी संसदीय बाहेर राहुल गांधींनी वेगळाच दावा करून सत्ताधारी आघाडीने विरोधी आघाडीची उपसभापती पदाची मागणी मान्य केली नाही, असे सांगितले.

     

    लोकसभा अध्यक्ष पदासाठी सहकार्य करू परंतु विरोधी आघाडीला लोकसभा उपाध्यक्षपदी दिले पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच राहुल गांधींनी थेट आक्षेप घेतला. मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच. मोदींना विरोधकांचे सकारात्मक सहकार्य नकोच आहे. त्यांची आत्तापर्यंतची स्ट्रॅटेजी भेदभावाचीच राहिली आहे, असा आरोप राहुल गांधींनी संसदेबाहेर केला. मल्लिकार्जुन खर्गे यांना राजनाथ सिंहांचा रिटर्न कॉल आला नाही त्यामुळे त्यांचा अपमान झाला, असा दावाही राहुल गांधींनी केला.

    त्याच वेळी सत्ताधारी आघाडी आणि विरोधी आघाडी यांच्यात लोकसभा अध्यक्ष पदाबाबत एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार सत्ताधारी आघाडीने उमेदवार ठरविलेल्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला, त्याचबरोबर विरोधी आघाडीकडून के. सुरेश यांनी त्याच पदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष पदाची लढत अटळ बनली आहे.

    The fight for the post of Lok Sabha Speaker is inevitable

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार