• Download App
    सण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला!!; जश्न ए रिवाजला फाटाThe festival of Dussehra Diwali has arrived, but the advertising trend has changed

    सण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा

    प्रतिनिधी

    मुंबई : सण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला!! “जश्न ए रिवाजला” फाटा!!, असे सन 2022 मध्ये घडले आहे. यंदाच्या दसरा दिवाळीच्या बहुतेक जाहिराती या सणांच्या परंपरांना अनुसरून केल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती विशेषत: उर्दू शब्द, विशिष्ट परंपरा वापरून केल्याचे दिसून येत होते. त्यात तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे रंग देखील बेमालूमपणे मिसळले होते. The festival of Dussehra Diwali has arrived, but the advertising trend has changed

    पण नेमका त्याच वेळी “नो बिंदी न बिझनेस” असा सोशल मीडिया ट्रेंड सुरू झाला. जाहिरातींमध्ये बेमलून पणे मिसळलेली धर्मनिरपेक्षता आम पब्लिकच्या लक्षात आली. त्याचा परिणाम विविध कंपन्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल झाला. त्यावेळी ऐन सणांच्या मध्ये जाहिराती बदलणे शक्य नव्हते.

    पण यंदा २०२२ मध्ये मात्र गेल्या दोन वर्षांमधला त्या विशिष्ट जाहिरातींचा प्रतिकूल अनुभव लक्षात घेऊन विविध ब्रँड्सनी आपल्या जाहिरातींच्या भाषेमध्ये आणि फोटोमध्ये आधीच बदल करून त्यामध्ये हिंदू परंपरांचा समावेश केला आहे. “जश्न ए रिवाज” जाऊन त्याऐवजी “कलर्स ऑफ स्प्लेंडर” आले आहे. या मॉडेल्सच्या कपाळावर बिंदी लावलेल्या दिसत आहेत. हा बदल बराच बोलका आहे!!

    The festival of Dussehra Diwali has arrived, but the advertising trend has changed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली