वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 41 वर्षांचा दुष्काळ संपवून भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल मिळवले याबद्दल भारतीय हॉकी टीमच्या कुटुंबीयांनी देशभर जल्लोष केला. भारतीय टीमने सुवर्ण पदक जिंकले असते तर आनंद मोठा झाला असता परंतु पदक मिळवणे आणि तेही देशासाठी मिळवणे हे अत्यंत आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय गोलकीपर पी आर श्रीजेश रवींद्र याचे वडिल रविंद्रन यांनी व्यक्त केली. भारतीय टीमने बलाढ्य जर्मनीला हरविले आणि मोठा भीम पराक्रम करत ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले याबद्दल अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. The families of the Indian hockey team rejoice; Indian team fills a big gap: Ashok Dhyanchand
जालंधरमध्ये मनदीप सिंग त्याच्या कुटुंबियांनी देखील पारंपरिक पंजाबी भांगडा नृत्य करत भारतीय टीमचा विजयाचा आनंद साजरा केला. भारतीय टीमचा आजचा जर्मनीवरील विजय भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. कारण दोन गोलची मोठी पिछाडी भरून काढत भारत आणि समोरच्या बलाढ्य टीमला पराभूत केले आहे.
सुरुवातीला बचावात्मक खेळ करणार्या भारताने अत्यंत अत्यंत आक्रमक रूप धारण केले त्याचे फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया महान भारतीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि भारतीय ऑलिम्पियन अशोक ध्यानचंद यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय टीमचे अभिनंदन केले आहे.
The families of the Indian hockey team rejoice; Indian team fills a big gap: Ashok Dhyanchand
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीतील मुलीवरील अत्याचारावरून विरोधक आक्रमक, केजरीवालांकडून चौकशीचे आदेश
- ड्रग्स प्रकरणात फरार ममता कुलकर्णीची याचिका फेटाळण्यात आली, न्यायालयाला सांगितले – औषधांसाठी पैसेही शिल्लक नाहीत
- Tokyo Olympics : विनेश फोगटने कुस्तीची उपांत्यपूर्व फेरी गाठली, स्वीडनच्या सोफिया मॅटसनला 7-1 ने पराभूत केले
- मध्य प्रदेशमध्ये पुराच्या विळख्यात 1200 पेक्षा जास्त गावे, सुमारे 6 हजार लोकांना वाचवले
- भारतीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ईडीने फ्लिपकार्टला 100 अब्ज रुपये दंडाचा इशारा दिला
- उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी प्रियांका गांधीच असतील पक्षाचा चेहरा, काँग्रेस एकट्याने सर्व जागा लढवणार