• Download App
    180 की 200??; मोदींना आव्हान द्यायचा INDI आघाडीचा नेमका आकडाच ठरेना!! The exact number of INDI Aghadi to challenge Modi was not determined

    180 की 200??; मोदींना आव्हान द्यायचा INDI आघाडीचा नेमका आकडाच ठरेना!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटके विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात INDI आघाडी एकत्र आली खरी, पण त्या एकजूट झालेल्या आघाडीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचा नेमका आकडाच ठरेना!!, अशी स्थिती आली. कारण दिल्लीतल्या रॅलीत बोलताना राहुल गांधींनी मोदी आणि त्यांचा भाजप 180 चा आकडा पार करू शकणार नाही, असे वक्तव्य केले, तर तिकडे दूर कोलकात्यात ममता बॅनर्जींनी मोदींना 200 चा आकडा पार करण्याचे आव्हान दिले. The exact number of INDI Aghadi to challenge Modi was not determined

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीचे मॅच फिक्सिंग केले आहे. त्यामुळेच ते 400 पार अशी आकडेवारी लोकांच्या तोंडावर फेकत आहेत. त्यांनी आमचे दोन खेळाडू अटक करून जायबंदी केले आहेत, पण असले कुठलेही प्रकार करून मोदी आणि त्यांचा भाजप 180 चा आकडा देखील पार करू शकणार नाहीत, अशी आव्हानात्मक भाषा राहुल गांधींनी रामलीला मैदानावरच्या रॅलीत वापरली.


    “अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कृत्यामुळे अटक झाली, आता कायदा…” अण्णा हजारेंचं विधान!


    तर तिकडे कोलकात्यात ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना 200 चा आकडा पार करण्याचे आव्हान दिले. पंतप्रधान मोदी कितीही म्हणत असले तरी ते 400 चा आकडा पार करू शकणार नाहीत. पश्चिम बंगाल मध्ये आम्ही सगळ्या 42 जागा जिंकू राज्यात मोदींना हवा असलेला सीएए किंवा एनआरसी हे दोन्ही कायदे आम्ही लागू करू देणार नाही, अशी आव्हानाची भाषा त्यांनी वापरली.

    ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस साठी फक्त 2 जागा सोडायची तयारी दाखवली होती. बाकीच्या 40 जागा त्यांची स्वतःची तृणमूल काँग्रेस लढणार होती. मात्र काँग्रेसने ममता बॅनर्जींचा प्रस्ताव फेटाळल्याने ममतांनी पश्चिम बंगाल मधलीI NDI आघाडी तोडून टाकली. सर्वच्या सर्व जागांवर म्हणजे 42 जागांवर तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार उभे केले, काँग्रेसने देखील डाव्या आघाडीशी युती करून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस विरोधात दंड थोपटले, तरी देखील त्या पक्षाचे नेते डेरेक ओबेरायन यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात तृणमूल काँग्रेस INDI आघाडीचा घटक पक्ष असल्याचा निर्वाळा दिला.

    एकीकडे काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा सोडायचे नाही आणि दुसरीकडेINDI आघाडीचा घटक पक्ष बनूनही राहायचे अशी “डबल गेम” ममता बॅनर्जींनी केली. पण या सगळ्यात पंतप्रधान मोदींना नेमका किती आकडा ओलांडायला सांगायचा याचे कन्फ्युजन राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या भाषणांमधून तयार झाले.

    The exact number of INDI Aghadi to challenge Modi was not determined

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Pahalgam attack : पहलगाम हल्ला : पाक संरक्षणमंत्र्यांकडून धमकी- भारताने पाणी थांबवल्यास हल्ला करू

    Pakistan bans : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का