• Download App
    काँग्रेसवर घराणेशाहीची चौफेर टीका, पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अख्खे वाड्रा कुटुंब सामील The entire Vadra family joins Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra

    काँग्रेसवर घराणेशाहीची चौफेर टीका, पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अख्खे वाड्रा कुटुंब सामील

    वृत्तसंस्था

    जयपूर : काँग्रेसवर गांधी घराण्याच्या कब्जाची आणि घराणेशाहीची चौफेर टीका होत असते पण तरीही गांधी घराणे आणि काँग्रेस या टीकेला बधायला तयार नाही. त्याचेच प्रत्यंतर आज राजस्थानात आले.  The entire Vadra family joins Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra

    काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थान मध्ये आहे. तेथे त्यांच्या समवेत अख्खे वाड्रा कुटुंब या यात्रेत सामील झाले आहे. राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि कन्या मिराया वाड्रा हे भारत जोडो यात्रेत सामील झाले.

    एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या संघटनेवर गांधी घराण्याचे अंकित झाल्याचा वारंवार आरोप करत असतात. बाकीचे विरोधी पक्ष जरी काँग्रेसला काही प्रमाणात पाठिंबा देत असले तरी काँग्रेस मधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्या विरोधी पक्षांचीही काँग्रेसशी लव्ह – हेट अशीच रिलेशनशिप आहे. पण असे असताना राहुल गांधी यांनी मात्र संपूर्ण वाड्रा कुटुंबालाच आपल्या भारत जोडो यात्रेत सामील करून घेतले आहे.



    या मुद्द्यावर सोशल मीडियात अनेकांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची जोरदार खिल्ली उडवली असून, जो जमानत पर चल रहे हैं वो ही लोग आज भारत जोड़ने निकले हैं। गजब तमाशा देखने को मिल रहा है।, असे एका युजरने म्हटले आहे.

    त्याच वेळी भारताचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी देखील राहुल गांधींची भारत जोडो यात्रेवरून खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींना या यात्रेतून भारत वगैरे काही जोडायचा नाही. त्यांना फक्त सत्तेची खुर्ची परत मिळवायची आहे. कारण सत्तेच्या खुर्चीशिवाय गांधी परिवाराची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी होत असते. मासा जसा पाण्यातून काढल्यावर तडफडतो, तसे गांधी परिवार सत्तेच्या खुर्ची वाचून तडफडत असतो. त्यांना हिंदुस्थान ही आपली खानदानी जहागिरी वाटते, असे शरसंधान साधणारे ट्विट काटजू यांनी केले आहे.

    The entire Vadra family joins Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य