विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : कालच्या भारत – पाकिस्तान दरम्यानच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात अख्खे नरेंद्र मोदी स्टेडियम जय श्रीरामच्या घोषणांनी गुंजले, पण सनातन धर्माला शिव्या देणारे उदयनिधी स्टालिन मात्र चिडले!!The entire Narendra Modi Stadium echoed with chants of Jai Shriram; But Udayanidhi who insulted Sanatan Dharma got angry!!
त्याचे झाले असे :
काल विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतली भारत विरुद्ध पाकिस्तान ही टॉप मोस्ट सेन्सिटिव्ह क्रिकेट मॅच नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झाली. त्यामध्ये भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा दारुण पराभव केला, पण या क्रिकेट सामन्यादरम्यान संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम मधले प्रेक्षक वारंवार जय श्रीराम मच्या घोषणा देत होते. पाकिस्तानी फलंदाज बाद झाला आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतायला लागला की जय श्रीराम च्या घोषणांमध्ये वाढ व्हायची. आवाज मोठा होत जायचा.
या घोषणांवर पाकिस्तानी खेळाडूंपैकी कोणीही काहीही आक्षेप नोंदविला नाही, पण त्या घोषणांमुळे सनातन धर्माला शिव्या देणारे उदयनिधी स्टालिन मात्र चिडले. पाकिस्तानी खेळाडू भारताचे पाहुणे आहेत. त्या पाहुण्यांना अशी “ट्रीटमेंट” देतात का??, असा सवाल करून त्यांनी भारतीय प्रेक्षकांना खिलाडू वृत्तीच्या उपदेशाचे डोस पाजले कुठलाही खेळ हा दोन देशांमध्ये प्रेम संबंध दृढ करण्यासाठी असा सवाल यातील भारतीय खिलाडू वृत्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत, मग अशावेळी पाकिस्तानी खेळाडूंना डिवचणाऱ्या घोषणा का दिल्या??, असा संतप्त सवाल उदयनिधी स्टालिन यांनी केला. आपल्या ट्विटर हँडलवर जय श्रीरामच्या घोषणांचा एक “निवडक” व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू बाद होऊन पवेलियनमध्ये परतत असताना प्रेक्षक जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचे ऐकू आले.
पण वास्तविक संपूर्ण सामन्यांमध्येच प्रेक्षकांनी वारंवार जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. उदयननिधी स्टालिन यांनी नेमका “निवडक” व्हिडिओ उचलून तो शेअर करत आपली सनातन धर्माविरुद्धची गरळ पुन्हा ओकली!!
The entire Narendra Modi Stadium echoed with chants of Jai Shriram; But Udayanidhi who insulted Sanatan Dharma got angry!!
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!