वृत्तसंस्था
भोपाळ : निवडणूक आयोगाने भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच राबविलेल्या प्रयोग मध्य प्रदेशात यशस्वी ठरला आहे. घरातून मतदान करण्याचा हा प्रयोग होता. राज्यात तब्बल 60000 पेक्षा जास्त वृद्ध आणि दिव्यांगांनी घरातून मतदान करत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. The Election Commission’s experiment was a success
मध्य प्रदेशाचे मुख्य निर्वाचन अधिकारी अनुपम राजन यांनी ही माहिती दिली. 80 वर्षांपेक्षा ज्यांचे जास्त आहे, अशा वृद्ध मतदारांकरता निवडणूक आयोगाने घरातून मतदानाची सोय केली होती. त्यासाठी विशिष्ट फॉर्म भरून घेतले होते. राज्यातल्या वृद्धांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
51,259 वृद्ध मतदारांनी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडून त्या पद्धतीने मतदान केले. दिव्यांगांसाठी देखील हाच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यातल्या 12,093 दिव्यांगांनी घरातून मतदान केले. अत्यावश्यक सेवेतील, जसे की फायर ब्रिगेड वैद्यकीय सेवा अशांमध्ये सहभागी असलेल्या 1113 मतदारांनी देखील याच सुविधा लाभ घेत मतदान केले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा घरातून मतदान करण्याचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशात यशस्वी ठरला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग हा प्रयोग देशात सर्वत्र राबविण्याचा विचार करत आहे.+
The Election Commission’s experiment was a success
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!