गुजरातच्या दंगलीमुळे संतप्त झालेल्या रांची येथील 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने सुडासाठी ड्रोन तंत्रज्ञान तयार करून इसीस ( इस्लामिक स्टेट) या संघटनेला दिले. आत्मघाती ड्रोन आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या त्याच्या संशोधनामुळे दहशतवादी गटांच्या ताकदीत वाढ झाली आहे. The drones, built by a young man from Ranchi for revenge, changed the way ISIS fights
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गुजरातच्या दंगलीमुळे संतप्त झालेल्या रांची येथील 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने सुडासाठी ड्रोन तंत्रज्ञान तयार करून इसीस ( इस्लामिक स्टेट) या संघटनेला दिले. आत्मघाती ड्रोन आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या त्याच्या संशोधनामुळे दहशतवादी गटांच्या ताकदीत वाढ झाली आहे.
गुजरातमधील कथित दंगलीमुळे सय्यद मुहम्मद अर्शियान हैदर हा कट्टरपंथी बनला. त्याने दाढी वाढविली. पालकांना त्यामुळे चिंता वाटू लागली. मात्र, एका मौलवीने त्याला आणखी बळ दिले. लोकांना खूश करण्यासाठी तुम्ही अल्लाहला राग येऊ देऊ नका, असे सांगितले. त्यानंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवीधर हैदर सौदी अरेबियातील दमाम येथे नोकरीसाठी जाण्याऐवजी इस्लामिक स्टेटमध्ये भरती झाला. 2017 पासून हैदर तुर्कस्थानच्या तुरुंगात आहे. आता तो 38 वर्षांचा आहे.
हैदरसारखे अनेक तरुण मौलवींच्या भडकावण्यामुळे इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश आता कोणत्या तरी देशातील तुरुंगात सडत आहेत.