वृत्तसंस्था
मुंबई – देशातल्या आत्तापर्यंतच्या गुन्हेगारी इतिहासातली सगळ्यात मोठी तस्करी एकत्र पकडण्यात आली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरातून तब्बल २९३ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत ८७९ कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येते. तस्करीचा हा माल पंजाबला पाठविण्यात येणार असल्याची माहिती देखील उघड झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. The Directorate of Revenue Intelligence has seized 300 kg of heroin at the Jawaharlal Nehru Port (JNPT) in Navi Mumbai,
इराणमार्गे हा कंटेनर रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे. या कंटेनरमध्ये सुमारे 879 कोटी रुपयांचे हेरॉईन होते. ते जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने ही कारवाई केली आहे. हे इराणमार्गे होणाऱ्या तस्करीचे मोठे प्रकरण आहे. जेएनपीटी बंदरातून हा कंटेनर पंजाबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्यावर्षी डीआरआयने सुमारे 191 किलो हेरॉइन जप्त केले होते. काल शुक्रवारी जप्त करण्यात आलेला 293 किलोचा साठा हा गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठा साठा असण्याची शक्यता आहे.
जेएनपीटी बंदरात सुरु असलेल्या आयात-निर्यातीच्या व्यवसायातून अनेक वेळा रक्तचंदन, सोने, बंदुक, ड्रग्ज अशा मालाची तस्करी करण्यात येत असल्याचे सीआययू, एसआययू आणि डीआरआय यांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची तस्करी आता उघडकीस आली आहे. हा माल पंजाबमध्ये पाठविण्यात येणार होता, हे उघ़ड झाल्यानंतर यामागचे प्रचंड मोठे रॅकेट असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
एनडीपीएस किटच्या मदतीने या मालाची तपासणी केली असता त्यामध्ये हेरॉईन असल्याची खात्री झाली आणि या कंटेनरमध्ये सुमारे 293 किलो हेरॉईन असल्याचे आढळून आले. या मालाची किंमत ही सुमारे 879 कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात, या कंटेनरच्या आयातदाराला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
The Directorate of Revenue Intelligence has seized 300 kg of heroin at the Jawaharlal Nehru Port (JNPT) in Navi Mumbai,
महत्त्वाच्या बातम्या
- ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा
- Jagannath Yatra : का काढली जाते भगवान जगन्नाथांची रथयात्रा, आख्यायिका काय सांगतात? जाणून घ्या वैशिष्ट्य!
- तक्रारी अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात ट्विटर, दिल्ली हायकोर्टाला दिली माहिती
- सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती
- का जाऊ शकते ममतांचे मुख्यमंत्रिपद? उत्तराखंड आणि पश्चिम बंगालच्या परिस्थितीत काय आहे साम्य? वाचा सविस्तर…