• Download App
    मदरशांमधील शिक्षणाची विदारक स्थिती, चारशे वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम, विज्ञानाऐवजी अंधश्रध्दांचे शिक्षण|The dire state of education in madrassas, a curriculum four hundred years ago, teaching superstitions instead of science

    मदरशांमधील शिक्षणाची विदारक स्थिती, चारशे वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम, विज्ञानाऐवजी अंधश्रध्दांचे शिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील मदरशांमधील शिक्षणाची अवस्था विदारक असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. येथे शिकणाºया मुलांना मुलांना 400 वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विज्ञान नाही तर अंधश्रध्दावर आधारित असलेल्या अभ्यासक्रमातून मुलांचे स्वप्न डॉक्टर, इंजिअिर नव्हे तर मौलवी बनविण्याचे आहे.The dire state of education in madrassas, a curriculum four hundred years ago, teaching superstitions instead of science

    या मदरशांचा अभ्यास केला असताना आयोगाला दिसून आले की मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये कुराणाचे असंख्य भाग आहे. मुलांना संकल्पना समजावून सांगण्यासाठी चित्रांचा वापर करून दिला जात नाही. कारण इस्लाममध्ये ते मान्य नाही. त्याचबरोबर मदरशांमध्ये मुलींच्या शिक्षणाला बंदी असल्याने मुलांना सहशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.



    देशभरातील मदरशांमध्ये तब्बल १ कोटी एक लाख विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, केवळ सहा हजार मदरसे आयोगाला दिसून आले आहेत. त्यामुळे लाखो मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना जेव्हा विचारले गेले की त्यांना मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे

    तेव्हा त्यांनी मौलवी किंवा मौलाना असे उत्तर दिले. याचे कारण म्हणजे येथे फक्त उर्दू शिकविले जाते. एका मुलाने सांगितले की त्याला डॉक्टर व्हायचे आहे. मात्र, त्यासाठी मदरशांमधील शिक्षण उपयोगाचे नाही. तो याठिकाणी उर्दू शिकतो आणि इतर सर्व विषय शिकण्यासाठी रात्री शिकवणी लावली आहे.

    The dire state of education in madrassas, a curriculum four hundred years ago, teaching superstitions instead of science

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य