विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सध्या भारतात बऱ्याच भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केरळ आणि उत्तर प्रदेश मध्ये पुरामुळे बरीच हानी झाली आहे. तर दिल्ली मध्ये देखील पावसाने आपला रंग दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मागे 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
The Delhi government has announced compensation of Rs 50,000 per hectare for crop damage caused by unseasonal rains
नुकसान झालेल्या पिकांचे महसूल अधिकारी सर्वेक्षण करतील. त्या नंतर पुढील दोन आठवड्यांत ही प्रोसेस सुरू केली जाईल. हेक्टरी 50,000 रुपये दराने नुकसान भरपाई दोन महिन्यांत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या आधी जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळी देखील दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसानभरपाई देखील दिली होती, जी आजवरची देशातील सर्वात जास्त दिली गेलेली नुकसान भरपाई आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
The Delhi government has announced compensation of Rs 50,000 per hectare for crop damage caused by unseasonal rains
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत
- Aryan Khan Drugs Case : एनसीबीच्या हाती ड्रग्जशी संबंधित आर्यनच्या चॅट्स, पार्टीच्या आधीही एका बड्या अभिनेत्रीशी चॅटिंग