प्रतिनिधी
हैदराबाद : या देशाचे निर्णय रझाकरी प्रवृत्तीला घेऊ देणार नाही!!, अशा कठोर शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातल्या धर्मांध फुटीरवाद्यांना इशारा दिला आहे. निमित्त होते, सरकारी पातळीवरील पहिल्या हैदराबाद मुक्ती दिन समारंभाचे!! The decisions of this country will not be allowed to take gratification
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर प्रथमच 17 सप्टेंबर 2022 रोजी आज सरकारी पातळीवर हैदराबाद मुक्ती दिन पाळण्यात येत आहे. याची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सिकंदराबादच्या परेड ग्राउंड वर झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मंत्री खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
अमित शाह यांनी आपल्या भाषणात हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचे औचित्य सविस्तरपणे विशद केले. आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांमध्ये जी सरकारे आली त्यांनी कधीच अधिकृत सरकारी पातळीवर हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याची हिंमत दाखवली नव्हती. कारण त्यांना व्होट बँक राजकारणाची भीती वाटत होती. हैदराबाद मुक्ती दिन पाळणे याचा अर्थ निजामाच्या जोखडातून भारतीय जनतेला मुक्ती मिळणे आणि तो विजय दिन साजरा केला तर आपली अल्पसंख्यांक मते जातील या भीतीने आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हैदराबाद मुक्ती दिन पाळला नव्हता. परंतु जनतेच्या मागणीनुसार सरकारी पातळीवर अधिकृत इथून पुढे हैदराबाद मुक्ती दिन 17 सप्टेंबर रोजी पाळण्यात येईल, असे अमित शाह यांनी जाहीर केले. या देशातले निर्णय रझाकारी प्रवृत्ती घेऊ शकत नाहीत आम्ही ते घेऊ देणार नाही असा इशारा अमित शहा यांनी आपल्या भाषणातून दिला.
अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये आर्य समाज – हिंदू महासभा यांच्या भाग्यनगर मुक्तिसंग्रामाचा देखील गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरम रामचंद्र राव आणि अन्य सहकार्यांनी 1938 मध्ये भाग्यनगर मुक्ती लढा दिला होता, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली. त्याचबरोबर हैदराबाद संस्थान मधील समाविष्ट असलेल्या मराठवाडा आणि कर्नाटकचा भाग येथे देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलने उभी राहिली त्याचा आढावा अमित शाह यांनी आपल्या भाषणातून घेतला. स्वामी रामानंद तीर्थ, बी. नरसिंह राव, पी. व्ही. नरसिंह राव आदी स्वातंत्र्य योद्धांना अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहिली.
केसीआर यांचा भारत एकता दिन
हैदराबाद मुक्ती संग्रामदिना वरून तेलंगणा राज्यांमध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर तापले आहे अमित शहा सरकारी अधिकृत सरकारी पातळीवर भारत सरकार तर्फे हैदराबाद मुक्ती दिन पाळत असताना तेलंगण राष्ट्र समितीचे केसीआर चंद्रशेखर राव यांचे सरकार मात्र भारत एकता दिवस पाळत आहे. त्यांनी “हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन” हे नाव टाळले आहे. त्याच वेळी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमात सहभागी व्हायला नकार देऊन त्या ऐवजी तिरंगा रॅलीचे आयोजन त्यांनी केले होते. हैदराबाद मधील हिंदू आणि मुस्लिम जनता धर्मनिरपेक्ष भारतात सामील होऊ इच्छित होती, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
The decisions of this country will not be allowed to take gratification
महत्वाच्या बातम्या
- मोदी मंत्रिमंडळाचा निर्णय : 5 राज्यांतील 15 जातींचा अनुसूचित जमातीत समावेश; यूपीच्या रविदास नगरचेही नाव बदलले
- गांगुली आणि जय शाह पदावर कायम राहतील: सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली, आता दोघेही 6 वर्षे पदाधिकारी राहू शकतील
- आरएसएसच्या जळत्या पोशाखावर भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पोस्ट केला नेहरूंचा शॉर्ट्स घातलेला फोटो, लिहिलं- यालाही आग लावणार का?
- महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार : वेदांताचे अनिल अग्रवाल यांची घोषणा; फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून राजकारण तापले