वृत्तसंस्था
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रभारी पदी निवड केल्यानंतर तसेच स्टार कॅम्पेनरच्या यादीत त्यांचे नाव टॉपला ठेवल्यानंतर छत्तीसगड मधील बंडखोर मंत्री टी. एस सिंगदेव यांनी सूचक विधान केले आहे.The decision of the Congress High Command will have to wait; Chhattisgarh Minister T. S. Singhdev’s outspokenness
छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल, असे ते म्हणाले आहेत. गेले काही महिने छत्तीसगडमध्ये नेतृत्व प्रकरणाच्या बातम्या जोर धरून आहेत. भूपेश बघेल आणि सिंगदेव या दोघांचेही गट काँग्रेस हायकमांडला दोन-तीन वेळा भेटून आले आहेत.
गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे सर्व आमदार पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. दोन्ही गटातील आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याच दरम्यान भूपेश बघेल यांची नियुक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मुख्य प्रभारी म्हणून झाली आहे. लखीमपूरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर प्रदेशचा दौराही करून घेतला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासमवेत ते दिवसभर होते.
या राजकीय पार्श्वभूमीवर टी. एस. सिंगदेव यांनी हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेतृत्व बदला संबंधीचा निर्णय सोपा नसतो. हायकमांड सर्व नेत्यांची विचारविनिमय करून योग्य निर्णय घेत असते.
आपल्याला हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल, असे सूचक विधान त्यांनी करून छत्तीसगडमधल्या संभाव्य राजकीय भूकंपाची चुणूक दाखविले दाखविल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
The decision of the Congress High Command will have to wait; Chhattisgarh Minister T. S. Singhdev’s outspokenness
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार
- Cruise Ship Drug Party Case : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानचा जामीन फेटाळला, जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची सूचना
- एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार
- मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धूंची तडफड कायम, व्हायरल व्हिडिओत म्हणाले, मला सीएम केले असते, यश दिसले असते, चन्नी 2022 मध्ये काँग्रेसला बुडवणार!
- ठाकरे – पवार सरकार वसुलीत “ससा”; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी “कासव”; देवेंद फडणवीस यांचे टीकास्त्र