• Download App
    प्रदेशातील हिंचारात मृतांची संख्या नऊवर; केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह १४ जणांवर खूनाचा गुन्हा|The death toll in the region's riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister's son

    प्रदेशातील हिंचारात मृतांची संख्या नऊवर; केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह १४ जणांवर खूनाचा गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ: रविवारी दुपारी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 जणांवर खून, गुन्हेगारी कट आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहराइचमधील नानपारा येथील रहिवासी जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.The death toll in the region’s riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister’s son

    शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोमवारी सकाळी एका पत्रकाराचा मृतदेहही सापडला. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 9 वर गेला आहे.



    दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी विरोधी नेत्यांना लखीमपूर खिरीला पोहोचू नये म्हणून नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये अखिलेश यादव, बसपा सरचिटणीस सतीश मिश्रा, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, आराधना मिश्रा आणि शिवपाल यादव यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.

    लखीमपूरला पोहोचलेल्या भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी, जोपर्यंत मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ केले जात नाही, त्यांच्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.

    The death toll in the region’s riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister’s son

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज