वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या धसक्याने क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला असून बिटकॉईन दर १० हजार डॉलरपर्यंत खाली उतरला आहे. The cryptocurrency market collapsed due to Omaicron; Bitcoin down to $ 10,000
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे शनिवारी क्रिप्टो बाजारात उलथापालथ झाली. बिटकॉइनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये शनिवारी मोठी घसरण झाली. गुंतवणुकदारांनी ओमायक्रॉनच्या आर्थिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री केली. त्यामुळे दर कोसळले आहेत.
जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिप्टो बिटकॉइनमध्ये १७ टक्क्यांची घसरली. एका क्षणी बाजारात बिटकॉइनने ४२ हजार डॉलर्सचा स्तर गाठला होता. भारतीय रुपयांनुसार, क्रिप्टोचा दर ३१.७० लाख प्रति बिटकॉइनच्या स्तरापर्यंत आला होता.
सुरुवातीला जवळपास १० हजार डॉलरने दर कोसळल्यानंतर बिटकॉइनचा दर पुन्हा सावरू लागला आणि ४७७००डॉलरवर पोहचला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी इथेरियमच्या दरातही १५ टक्क्यांची घट दिसून आली. इथेरियमचा दर हा ३९०० डॉलरवर आला.
बिटकॉइनमध्ये घसरण
१० नोव्हेंबर रोजी ६९००० डॉलरच्या पातळीला स्पर्श केल्यापासून, बिटकॉइनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत सुमारे २१००० डॉलरची घसरण झाली आहे. शिवाय, एथेरियम ब्लॉकचेनशी संबंधित सिक्का आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिप्टो इथरमध्ये शनिवारी १५.९ टक्क्यांनी घसरण झाली. येत्या काही दिवसांमध्ये व्याज दरात वाढ करण्याचे संकेत अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. क्रिप्टोबाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कार्डेनो, सोलाना पॉलीगॉन आणि शिबा इनूमध्ये १३ ते २० टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.
The cryptocurrency market collapsed due to Omaicron; Bitcoin down to $ 10,000
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, ते रसायनशास्त्र, युतीच्या मतांची बेरीज-वजाबाकी होत नाही, अमित शहा यांचा दावा
- सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा
- मुख्यमंत्री महिला आमदाराला म्हणाले तुम्ही सुंदर दिसता, आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली तक्रार
- कलम ३७० लागू करण्यापूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती का? अमित शहा यांचा सवाल