आझम खान यांच्यावर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांना ‘Hate Speech’प्रकरणी मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 1000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. The court sentenced Azam Khan to two years in the Hate Speech case
आझम खान यांच्यावर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आझम खान यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तत्कालीन रामपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण 2019 चे आहे जेव्हा आझम खान सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शहजाद नगर पोलीस स्टेशन परिसरातील धामोरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तत्कालीन रामपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधत प्रक्षोभक भाषण केले होते.
या निवडणुकीत समाजवादी पक्ष (एसपी) आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष (बसपा) एकत्र लढले होते. त्यावेळी आझम खान रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा युतीचे उमेदवार होते. ही बाब समोर आल्यानंतर एडीओ पंचायत अनिल चौहान यांनी आझम खानविरोधात शहजाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
The court sentenced Azam Khan to two years in the Hate Speech case
महत्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री अजितदादांना मंत्रालयात सहाव्या नव्हे, पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन!!
- हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!
- तडजोड : अर्थ आणि सहकार ही दोनच मलईदार खाती राष्ट्रवादीकडे; अजितदादा अर्थमंत्री, पण जलसंपदा खाते फडणवीसांकडे, तर महसूल खाते विखेंकडेच!!;
- मिशन चंद्रयान 3 यशस्वी!!; पंतप्रधान मोदींनी फ्रान्स मधून केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन!!