कविता यांनी अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी गुरुवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात केली होती. The court rejected BRS leader K. Kavitas demand for interim bail
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविताला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. के. कविता यांनी अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सोमवारी फेटाळला.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांनी अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी गुरुवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात केली होती. याचिकेत त्यांनी दावा केला होता की त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याला त्याच्या आईच्या “नैतिक आणि भावनिक आधाराची” गरज होती.
नुकतच, विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयाने कविता आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तर्फे हजर असलेल्या वकिलाचा युक्तिवाद ऐकला आणि सोमवारी आपला निर्णय राखून ठेवला. सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी बीआरएस नेत्यांची बाजू मांडताना दावा केला की आईची अनुपस्थिती वडील, बहीण किंवा भाऊ पूर्ण करू शकत नाही.
The court rejected BRS leader K. Kavitas demand for interim bail
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे आलेत कांशीरामांच्या भूमिकेत!!
- नाशिकमध्ये महारांगोळीतून राष्ट्रहितासाठी मतदानाचा संदेश; नववर्ष स्वागत समितीचा गोदाघाटावर उपक्रम
- NIAचे यूपी-बिहारमधील 12 ठिकाणी छापे ; मोबाईल फोन, सिमकार्डसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त
- सातारा + माढ्यात राष्ट्रवादीकडे “सक्षम” उमेदवारांचे “दुर्भिक्ष्य”; पवारांचे फक्त बारामती वर लक्ष!!