विशेष प्रतिनिधी
वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापीच्या परिसरातील व्यास तळघरात पूजा अर्जेची परवानगी वाराणसी कोर्टाने काल दिली. त्यासाठी 7 दिवसांमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला दिले होते. परंतु, ट्रस्टने अवघ्या 12 तासांमध्ये ती व्यवस्था करून काल रात्री 11.00 वाजताच राम मंदिराचा मुहूर्त काढून देणाऱ्या गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या हस्ते व्यास तळघरात पूजा सुरू केली. त्यानंतर आजपासून व्यास तळघरात नियमित पूजा सुरू झाली आहे.The court had given a deadline of 7 days, but the worship started within 12 hours in the basement of Vyasa in Gyanvapi!!
वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात तब्बल 31 वर्षानंतर व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या हस्ते ही पूजा करवून घेतली. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चा केली. पूजेच्या समयी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा, मंदिर प्रशासनाचे सीईओ उपस्थित होते. पूजेची पद्धत गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ठरवली. त्या विधि विधानासह व्यासजींच्या तळघरात पूजा केली. ओम प्रकाश मिश्रा गर्भ गृहाचे पुजारी आहेत. पूजेनंतर काही लोकांना चरणामृत आणि प्रसादही दिला.
गणेश्वर शास्त्री द्रविड यांनीच रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढला होता. अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास आणि काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनाचा मुहूर्तही त्यांनीच काढलेला. त्यांनीच आता ज्ञानवापी परिसराच्या तळघरात पूजा-अर्चा केली.
कोर्टाचा आदेश
बुधवारी दुपारी 3.00 वाजता वाराणसी जिल्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला. निर्णयामध्ये व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा आदेश होता. आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला देण्यात आली होती. 7 दिवसांच्या आता तिथे पूजा करण्याची व्यवस्था करावी. कोर्टाच्या आदेशानंतर 12 तासांत व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली.
छावणीमध्ये बदलला ज्ञानवापी परिसर
जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात करण्यात आलं. बुधवारी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. डी.एम. पोलीस आयुक्त आणि अन्य अधिकारी रात्री ज्ञानवापी परिसरात पोहोचले. रात्री 11.00 वाजता गणेश्वर शास्त्री द्रविड मंदिर परिसरात पोहोचले. 31 वर्षानंतर ज्ञानवापी परिसरात पूजा झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता आहे. कुठेही अप्रिय घटना घडलेली नाही.
The court had given a deadline of 7 days, but the worship started within 12 hours in the basement of Vyasa in Gyanvapi!!
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्प 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार!
- सीतारामन यांच्या बडतर्फीची मागणी पडली महागात, आयआरएस अधिकारी निलंबित
- ED च्या धसक्याने झारखंडमध्ये उलटफेर; कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय बारगळला; चंपई सोरेन यांची करावी लागली निवड!!
- राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??