• Download App
    मुलाला परत मिळविण्यासाठी त्या दोघांनी अखेर केले लग्न, केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारविरोधात दांपत्याचा लढा|The couple finally got married to get their child back, the couple's fight against the Communist Party government in Kerala

    मुलाला परत मिळविण्यासाठी त्या दोघांनी अखेर केले लग्न, केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारविरोधात दांपत्याचा लढा

    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपूरम : मुलीचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते. त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारच या दोघांच्या विरोधात उभे ठाकलेले. पोटच्या मुलाला सोडून देण्याची वेळ या दोघांवर आलेली. परंतु, मुलाच्या मायेने दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला आणि आपल्या १४ महिन्यांच्या मुलालाही परत मिळविले.The couple finally got married to get their child back, the couple’s fight against the Communist Party government in Kerala

    केरळमधील कम्युनिस्ट पक्षातील ही कथा आहे. अनुपमा ही कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी शाखेची कार्यकर्ती. अजित देखील कम्युनिस्ट पक्षाच्या युवका संघटनेत कार्यरत होता. दोघांमध्ये प्रेम फुलले. मात्र, अनुपमाच्या आई-वडिलांनी अजितसोबतच्या तिच्या नात्याला विरोध केला.



    अनुपमा आणि अजित एकत्र राहू लागले. अनुपमा गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्मही दिला. मात्र, तिचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याने त्यांनी दोघांना दूर केले. मुलाला त्यांच्यापासून हिरावून घेतले. दूर आंध्र प्रदेशात त्याला दत्तक देऊन टाकले.

    मात्र, अनुपमा आणि अजितचे मन आपल्या बाळासाठी तुटत होते. राज्य सरकारच विरोधात असतानाही ते लढत होते. शेवटी धाडस करून त्यांनी ३१ डिसेंबर रोजी नोंदणी पध्दतीने विवाह केला. त्यापूर्वी आपल्या बाळालाही शोधले. दोघांची डीएनए चाचणी झाल्यानंतर हे बाळ त्यांचे असल्याचे सिध्द झाले आहे. विवाहानंतर आता आपल्या बाळासोबत ते राहू शकणार आहेत.

    लग्नानंतर विवाह नोंदणी कार्यालयातून बाहेर पडताना, अनुपमाचा हात धरून, अजित म्हणाले की त्यांनी एक महिन्यापूर्वी विशेष विवाह कायद्यानुसार अर्ज केला होता. आम्ही पहिल्यांदा एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा (२०२१ च्या सुरुवातीला) आम्ही लग्न करायचे ठरवले होते.

    मात्र, परिस्थिती अनुकूल नसल्याने मूल परत मिळणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. लोक आम्हाला विचारत होते की आम्ही लग्न करू की वेगळे होऊ. मला आशा आहे की अशा अफवा आता थांबतील.

    अजित म्हणाला की त्याला पुढे नोकरी मिळेल अशी आशा आहे. मी एका खाजगी रुग्णालयात पीआरओ होतो आणि अशीच नोकरी शोधत आहे. अनुपमाला तिचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.

    शुक्रवारी झालेल्या लग्नात अजितचा भाऊ राजेश आणि त्यांचे मित्र जोमन जॉय आणि अमृता कृष्णा साक्षीदार होते. माझे आई-वडील आणि नातेवाईक उपस्थित होते, पण अनुपमाच्या कुटुंबातील कोणीही आले नाही.

    The couple finally got married to get their child back, the couple’s fight against the Communist Party government in Kerala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य