• Download App
    हैदराबादमध्ये दगडांचे देशातील पहिले संग्रहालय, वेगवेगळे ३५ प्रकारचे दगड पाहता येणार ; अभ्यासकांना मोठी संधी । The country's first stone museum in Hyderabad, 35 different types of stones can be seen; Great opportunity for

    हैदराबादमध्ये दगडांचे देशातील पहिले संग्रहालय, वेगवेगळे ३५ प्रकारचे दगड पाहता येणार ; अभ्यासकांना मोठी संधी

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये दगडाचे देशातील पहिले संग्रहालय उभारले आहे. या संग्रहालयात वेगवेगळे ३५ प्रकारचे दगड पाहता येणार आहेत. The country’s first stone museum in Hyderabad, 35 different types of stones can be seen; Great opportunity for

    दगडाचे संग्रहालय हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण, त्याचे महत्व मोठे आहे. कारण भूगर्भशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संग्रहालय महत्वाची भूमिका बजावू शकते. एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारचे दगडाचे नमुने त्यांना पाहता येणार आहेत. माती, दगडांचा अभ्यास म्हणजे भूगर्भशास्त्र. कारण अख्ख्या सृष्टीचे ज्ञान ज्या शाखेतून मिळते ती शाखा म्हणजे भूगर्भशास्त्र आहे.



    कारण या शाखेशी अनेक शाखा जसे पदार्थविज्ञान, रासायनशास्त्र, जीवशास्त्र,गणित आणि भू, आकाश, पाताळ आणि खगोलाविज्ञानसह जगाचे ज्ञान जोडले गेले आहे. त्यामुळे भगर्भशास्त्रज्ञ सर्व शाखांचा कमी, अधिक ज्ञानी असतो. त्या दृष्टीने हे संग्रहालय त्यांच्यासाठी महत्वाची भूमिका तर बजावेल. त्या शिवाय कुतूहल म्हणून नागरिक हे संग्रहालय पाहू शकतो.

    या संग्रहालायाचे उदघाटन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले. या संग्रहालयात भारताच्या विविध भागांतील सुमारे ३.३ अब्ज वर्षे ते ५५ दशलक्ष वर्षे गटातील सुमारे ३५ विविध प्रकारचे खडक प्रदर्शित केले आहेत. हे खडक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १७५ किमी अंतरापर्यंत पृथ्वीच्या सर्वात खोल भागाचे प्रतिनिधित्व करतात.

    The country’s first stone museum in Hyderabad, 35 different types of stones can be seen; Great opportunity for

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!