वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.The country will have its first female tribal president; NDA candidature for Draupadi Murmu !!; Who are they
याबाबत जे. पी नड्डा म्हणाले की, एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. 20 नावांवर व्यापक विचारविनिमय केला त्यावेळी पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावे, असे ठरवले होते. त्यात आदिवासी भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात येत आहे. आम्हाला अपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, परंतु विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केले, असे नड्डा म्हणाले.
- कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
- द्रौपदी मुर्मू ओडिशा येथील आदिवासी संथाल समाजातून येतात. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षिका राहिल्या आहेत. त्यांचे पती बँक अधिकारी होते.
- ओरिसाच्या नवीन पटनाईक मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद भूषवले आहे.
- द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल राहिल्या आहेत. देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत.
- ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या दोनदा रायरंगपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा आमदार होत्या.
- भाजपा आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.
The country will have its first female tribal president; NDA candidature for Draupadi Murmu !!; Who are they
महत्वाच्या बातम्या
- राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत “नॉट रिचेबल” वाचा नावे!!
- 1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!
- भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार
- ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!