बैठकीनंतर डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्लीला जाणार
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण, बेंगळुरू येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेतील, असे ठरले आहे. The Congress President’s decision regarding the Chief Minister post of Karnataka was decided in the Legislature Party meeting
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा एक ओळीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी बंगळुरूमधील ज्या हॉटेलमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली त्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे सर्वात मोठे दावेदार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार सोमवारी सकाळी दिल्लीत येत आहेत. यासोबतच रणदीप सुरजेवाला आणि केसी वेणुगोपालही दिल्लीला पोहोचणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष खरगे मुख्यमंत्री म्हणून कोणतेही नाव निश्चित करण्यापूर्वी काँग्रेस हायकमांडचे मत घेऊ शकतात.
बंगळुरू येथील हॉटेलमधील बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या बैठकीत कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा एक ओळीचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनी मांडला होता, ज्यावर सर्व आमदारांनी एकमताने निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत पुढील निर्णय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेतील. या बैठकीनंतर डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीला जाणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. तेथे ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत.
The Congress Presidents decision regarding the Chief Minister post of Karnataka was decided in the Legislature Party meeting
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??