विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी आम्ही इंदिराजींची भाषणे ऐकत होतो, त्या म्हणायच्या या देशासाठी मी माझ्या रक्ताचा थेंब थेंब वाहीन. इंदिराजींनी देशासाठी बलिदान केले, पण असल्यास इंदिराजांची काँग्रेस तुकडे तुकडे गॅंगच्या ताब्यात गेली आहे. अशा स्थितीत आणि तिथे राहू शकत नाही, असा प्रखर प्रहार दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी आज केला.The Congress of Indiraji, who sacrificed for the country, fell into the hands of the Gang; Arvind Singh Lovely hit as soon as he entered BJP!!
अरविंद सिंह लवली यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासवेत दिल्लीच्या तीन आमदारांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या मध्यवर्ती दिल्ली प्रदेश काँग्रेस समिती फुटली आणि काँग्रेसवर नवा अध्यक्ष शोधण्यापासून नवा राजकीय संसार थाटण्याची वेळ आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अरविंद सिंह लवली, राजकुमार चव्हाण आणि नसीब सिंह त्यांचे स्वागत केले. या तीन बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे दिल्ली काँग्रेस फुटली आहे.
दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पार्टीशी समझोता करून दिल्लीच्या 7 जागांपैकी 4 जागा भ्रष्ट आम आदमी पार्टीला दिल्या. तुझ्या आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचाराशी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता कर्ठम होऊन लढला, त्याच पार्टीशी समझोवता केल्याने काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवर मुळातच फार मोठे नुकसान झाले. आता तर काँग्रेस संघटना तुकडे तुकडे गँगच्याच ताब्यात गेली आहे. कारण तिथे काँग्रेसने कन्हैया कुमार सारख्या तुकडे तुकडे गँगच्या म्होरक्याला लोकसभेचे तिकीट देऊन उभे केले आहे. दिल्लीत आता काँग्रेस पुनरुज्जीवीत होऊ शकत नाही, असे शरसंधान अरविंद सिंह लवली यांनी साधले.