हिंदूत्ववादी विचारांच्या गाईच्या प्रेमाची कम्युनिस्टांकडून नेहमीच हेटाळणी केले जाते. गोमातेच्या पूजनावरून हिंदूत्ववादी मान्यवरांची चेष्टा करणारे विनोदही कम्युनिस्टांकडून केले जातात. मात्र, कम्युनिस्टांनाही गाईचे महत्व पटले आहे. केरळ सरकारच्या मालकीच्या कंपनीकडून पंचगव्य गृहतम हे औषधी म्हणून विकले जात आहे. त्यामध्ये गाईचे शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि ही यांचा समावेश आहे.The communists, who were evading Goprema, understood the importance of cows.
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : हिंदूत्ववादी विचारांच्या गाईच्या प्रेमाची कम्युनिस्टांकडून नेहमीच हेटाळणी केले जाते. गोमातेच्या पूजनावरून हिंदूत्ववादी मान्यवरांची चेष्टा करणारे विनोदही कम्युनिस्टांकडून केले जातात.
मात्र, कम्युनिस्टांनाही गाईचे महत्व पटले आहे. केरळ सरकारच्या मालकीच्या कंपनीकडून पंचगव्य गृहतम हे औषधी म्हणून विकले जात आहे. त्यामध्ये गाईचे शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि ही यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ही औषधी अस नाव असलेले हे आयुर्वेदिक उत्पादन दमा, मानसिक आजार, अपस्मार, ताप या आजारांबरोबरच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी हे औषध प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
केरळ सरकारची ही कंपनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करणारी कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कंपनीने आत्तापर्यंत सातत्याने नफा कमाविला असून केरळ सरकारला लाभांशही दिला आहे.
औषधी कंपनीच्या गो उत्पादनांची माहिती मिळाल्यावर नेटकऱ्यांनी कम्युनिस्टांना चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. इतरांची गोप्रेमावर हेटाळणी करणारे कम्युनिस्ट सरकार आता गो उत्पादने प्रभावी सांगत आहे. ही उत्पादने किती प्रभावी आहेत, याची जाहिरात करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या हेटाळणीबद्दल माफी मागणार का असा सवालाही केला जात आहे.
पंचगव्य गृहतम या कंपनीच्या औषधी या ब्रॅँडची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात आहे. यामध्ये गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही आणि तूप या पाच घटकांचा समावेश आहे. २०० आणि ४०० मिलीलिटरच्या जारमध्ये ही उत्पादने असून जेवणापूर्वी १० ते २० मिलीलिटरचा डोस घ्यावा असे म्हटले आहे. अॅमेझॉनवरही हे औषध विक्रीसाठी उपलब्ध आहे.
The communists, who were evading Goprema, understood the importance of cows.
महत्त्वाच्या बातम्या
- चार मुस्लीमांच्या अपघाती मृत्यूनंतर कॅनडात चर्चा ‘इस्लामोफोबिया’ची
- व्वा ! उद्धव सरकार आडवी बाटली उभी करुन दाखवलीच
- पाकिस्तान, इराणशी फटकून असणाऱ्या तालिबान्यांसोबत भारताचा ‘धूर्त’ संवाद
- राज्यांनी घातलेल्या गोंधळानंतर मोदींनी नोंदवली 44 कोटी लसींची मागणी
- दहा चपात्या, डाळ-भाताने भागेना पहिलवान सुशील कुमारची भूक