वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यात ओमिक्रॉनने आव्हान आहे. यामुळे मुंबई आणि राजधानी दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली. The collision of the third wave of the corona; The number of patients has doubled in Mumbai and Delhi
दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत एका दिवसात २५१० नवे रुग्ण आढळले आहेत. धारावीत १७ रुग्ण आढळले. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे.
मुंबईत पुन्हा कोरोनाचे संकट
देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने होणारी वाढ भयावह आहे. यात मुंबईत बुधवारी १३७७ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर गुरुवारी हा आकडा थेट २५१० वर पोचला आहे. त्याच वेळी, बुधवारी महाराष्ट्रात ९०० नवीन रुग्ण आढळले, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्गामध्ये ओमिक्रॉनचे ८५ रुग्ण आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे प्रशासनास अवघड जाऊ शकते. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. तसेच रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
The collision of the third wave of the corona; The number of patients has doubled in Mumbai and Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होमक्वारंटाईन; सुळे कुटुंबियांना कोरोना झाल्याने खबरदारी
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जगभरात मुंग्यांच्या आहेत तब्बल १२००० प्रजाती
- महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक
- मनी मॅटर्स : अतिरिक्त खर्चावर लक्ष ठेवणारे अॅप्स वापरा आणि पैसा वाचवा
- मेंदूचा शोध व बोध : शिकायला वयाचं बंधन नाही , मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, कधीच थांबत नाही