• Download App
    कुंडूझ, हेरत, गझनी, कंदाहार ही शहरे तर तालिबानच्या ताब्यात गेली, काबूल पडण्यापूर्वी तालिबानशी समझोता करण्याची धडपड । The cities of Kunduz, Herat, Ghazni and Kandahar fell to the Taliban, who struggled to reach an agreement with the Taliban before falling to Kabul

    कुंडूझ, हेरत, गझनी, कंदाहार ही शहरे तर तालिबानच्या ताब्यात गेली, काबूल पडण्यापूर्वी तालिबानशी समझोता करण्याची धडपड

    वृत्तसंस्था

    काबूल : कुंडूझ, हेरत, गझनी, कंदहार अशी एकापाठोपाठ एक महत्त्वाची शहरे तालिबान ताब्यात घेत असताना दुसरीकडे कतारमध्ये मात्र पाच देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या चर्चेत सहभागी झाले आहेत. The cities of Kunduz, Herat, Ghazni and Kandahar fell to the Taliban, who struggled to reach an agreement with the Taliban before falling to Kabul

    48 तासांच्या आत तालिबानने आपले आक्रमण वाढवून गझनी, हेरत आणि कंदाहार ही महत्वाची शहरे ताब्यात घेतली. आपल्या जुन्याच पद्धतीने या शहरांमध्ये अंमल बसविण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याच वेळी काबूलमधल्या राजवटीने तालिबानला सत्ता वाटपाची ऑफर दिली आहे. ही ऑफर तालिबानने अद्याप धुडकावली नसली तरी त्याला अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही.



    दरम्यान कतारची राजधानी दोहामध्ये अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, भारत आणि पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तान मधील पेचप्रसंगावर आणि संघर्ष यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करताहेत. तालिबानच्या प्रतिनिधींचाही यात सहभाग आहे. नाटो फौजा मागे घेतल्यानंतर तालिबानची आक्रमकता वाढून अफगाणिस्तान आतली काबुल वगळता सर्व शहरे तालिबानच्या ताब्यात येत आहेत. त्यातली वर उल्लेख केलेली शहरे ताब्यात आल्यानंतर त्यांनी अधिकृत घोषणा न करता तेथे शरीयत कायदा लागू केला आहे. शैक्षणिक संस्थांपासून महिलांशी संबंधित इतर संस्था बंद पाडण्यात आल्या आहेत. पुरुष आणि महिलांची सार्वजनिक ठिकाणी वर्तणुकीची नियमावली लागू करण्यात आली आहे.

    अशा स्थितीत अमेरिका-रशिया अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तान यांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या 90 दिवसांमध्ये काबुलवर देखील तालिबानचा कब्जा होऊ शकतो, असा रिपोर्ट अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय पेंटॅगॉन कडे आलेला आहे. काबूल तालिबानच्या ताब्यात जाण्यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रियेने वेग घ्यावा आणि अफगाणिस्तानच्या सरकारी फौजा तालिबान यांच्यात सत्ता वाटपाचे सत्ता वाटपाचा तोडगा निघावा असे प्रयत्न या पाच देशांचे आहेत.

    The cities of Kunduz, Herat, Ghazni and Kandahar fell to the Taliban, who struggled to reach an agreement with the Taliban before falling to Kabul

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप