• Download App
    रशियावरील दबाव वाढविण्यासाठी केंद्राने इतर देशांना सोबत घ्यावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूचना|The Center should join hands with other countries to increase pressure on Russia, the RSS suggested

    रशियावरील दबाव वाढविण्यासाठी केंद्राने इतर देशांना सोबत घ्यावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूचना

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने रशियावरील दबाव वाढविण्यासाठी अन्य देशांना सोबत घ्यावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी केली आहे. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईला संघाने विरोध दर्शविला आहे. युद्धाने कोणत्याही प्रश्नाचे समाधान होत नाही तर मानवतेचे नुकसानच होते, असे म्हटले आहे.The Center should join hands with other countries to increase pressure on Russia, the RSS suggested

    पुतीन यांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा म्हणून जागतिक नेते, राजनैतिक अधिकारी आणि सिव्हिल सोसायटी यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे इंद्रेशकुमार यांनी म्हणाले. पुतीन यांनीही तातडीने हे युद्ध थांबवून चर्चेच्या माध्यमातून हा तिढा सोडवावा असे त्यांनी नमूद केले.



    भारताला आज शांततेची गरज असून युद्धाला खतपाणी घालेल अशी कोणतीही स्थिती निर्माण होता कामा नये. युद्धाचे परिणाम हे अत्यंत भयावह असतात असे त्यांनी नमूद केले.रशियाने युद्धखोरीचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गावर चालावे

    म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्मिक नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युद्धाने कोणतीही समस्या सुटत नाही, युद्धामध्ये हजारो लोकांचा जीव जातो, लाखो बेघर होतात आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी होते, असे इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे.

    The Center should join hands with other countries to increase pressure on Russia, the RSS suggested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार