• Download App
    सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयाला लागली अचानक आग|The CBI headquarters in Delhi caught fire suddenly

    सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयाला लागली अचानक आग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली स्थित केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या मुख्यालय इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. दिल्लीच्या लोधी रोडवर हे कार्यालय आहे.The CBI headquarters in Delhi caught fire suddenly

    सकाळी जवळपास ११.३५ मिनिटांनी ही घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच सीबीआय इमारतीत काम करणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं बाहेर पडले. या आगीत कोणतेही नुकसान झालेले नाही.



    सीबीआय इमारतीतून येणाºया धुराच्या लोटांनी परिसरातील अनेक नागरिक धास्तावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळविले.

    वीजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक चौकशीत समोर येतंय. सीबीआय इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये ही आग लागली होती.

    सीबीआयच्या मुख्य कार्यालयात वेगवेगळ्या प्रकरणांचे महत्त्वाची कागदपत्रं असतात. त्यामुळे या आगीत काय नुकसान झालंय तसंच या आगीमागे नेमकं काय कारण आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

    The CBI headquarters in Delhi caught fire suddenly

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Piyush Goyal : भारत-अमेरिका व्यापार करार फेब्रुवारी अखेरपर्यंत अंतिम होईल; मार्चमध्ये स्वाक्षरी होणार; 1 एप्रिलपासून लागू होण्याची अपेक्षा

    DGCA : विमानात गोंधळ घातल्यास 30 दिवसांची बंदी लागेल; DGCAची सूचना

    Anil Ambani : अनिल अंबानी म्हणाले- परवानगीशिवाय देश सोडणार नाही, ₹40 हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र