प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी, देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जाणारे कर्नाटकचे मंत्री एन. नागराजू (एमटीबी) यांनीही अर्ज भरताना 1,609 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांनी सोमवारी बंगळुरूच्या बाहेरील होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.The candidate declared wealth of 1609 crores, Karnataka N. Nagaraju’s affidavit in discussion, read in detail…
नागराजू यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचा व्यवसाय शेतकरी आणि व्यापारी असा उल्लेख केला आहे. त्यांची पत्नी एम. शांताकुमारी गृहिणी आहेत. नागराजू यांच्याकडे 536 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 1,073 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
सध्या एमएलसी असलेले नागराजू यांनी जून 2020 मध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवताना पत्नीसह सुमारे 1220 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. सोमवारी नामांकनासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 98.36 कोटी रुपयांचे दायित्व घोषित केले आहे.
72 वर्षीय नागराजू यांनी 9वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी शेती, घरगुती मालमत्ता, व्यवसाय असे उत्पन्नाचे स्रोत दिले आहेत. नागराजू यांनी होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 2018ची विधानसभा निवडणूक जिंकली. पण नंतर त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला. नागराजू हे 17 आमदारांपैकी एक होते ज्यांच्या राजीनाम्यामुळे 2019 मध्ये काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पडले.
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा होस्कोटे येथील अपक्ष उमेदवार शरथ बाचेगौडा यांच्याकडून पराभव झाला, त्यानंतर शरथ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ते आमनेसामने आहेत.
नागराजू यांच्या मालमत्तेचा तपशील
रोख – 64,89, 302 रुपये
पत्नीकडील रोख – 34,29,445
बँकेत ठेव – 20,12,31,011 (बचत खाते)
मुदत ठेव – 33,08,01,765
पत्नीच्या नावावर बँकेत जमा – 6,16,47,987 (बचत खाते)
मुदत ठेव – 1,99,5000
The candidate declared wealth of 1609 crores, Karnataka N. Nagaraju’s affidavit in discussion, read in detail…
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी येण्याऐवजी वेणूगोपाल मातोश्रीवर आले; उद्धव यांनाच सोनिया दरबारी हजर राहण्याचे निमंत्रण देऊन गेले!!
- नितीश कुमारांच्या राज्यात वाळू माफियांची वाढली मुजोरी; महिला अधिकाऱ्यास मारहाण करत, फरटपत नेले!
- Karnataka Elections 2023 : भाजपाने उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; सर्वच राजकीय पक्षांनी कसली कंबर!
- राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!!