ही घटना गुरुवारी रात्री फेज-२ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गेढा गावात घडल्याची माहिती आहे.The burning of the hands made the three feel good, the clothes caught fire and both died; One was seriously injured.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : थंडी चांगलीच वाढू लागली आहे. त्यामुळे काही जण लाकडं पेटवून हात शेकत असतात.मात्र, आगीसमोर हात शेकणे तिघ जणांच्या चांगलच अंगलट आल आहे.घटना अशी घडली की,हात शेकताना कपड्यांना आग लागून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला.
ही घटना गुरुवारी रात्री फेज-२ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गेढा गावात घडल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेढा गावात गुरुवारी रात्री काही लोक लाकडं पेटवून हात शेकत बसले होते.
दरम्यान, तीन मुलांच्या लोकरीच्या कपड्यांनी अचानक आग पकडली.ही तिन्ही मुलं भाजले आहेत.नागरिकांनी तिन्ही मुलांच्या कपड्यांना लागलेली आग विझवीत तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोन मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला , तर एकजण जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीला पाठविण्यात आले. जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
The burning of the hands made the three feel good, the clothes caught fire and both died; One was seriously injured
महत्त्वाच्या बातम्या
- अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य मार्गदर्शक संजय राऊत यांची जयंतीनिमित्त आदरांजली
- विलीनीकरण शक्य नाही हे माहीत होत ,तर जाहीरनाम्यात उल्लेख का केला ? ; गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका
- IT RAID UTTAR PRADESH : २४ तास-१३ मशिन-३० कर्मचारी.. अन् अत्तराचा फाया नव्हे नोटा नेण्यासाठी मागवले चक्क कंटेनर ….अबब हे फोटो पहाच…!
- मुंबई : न्हावाशेवा बंदरातून जप्त केले तब्बल १५ हजार किलो रक्तचंदन ; रक्तचंदनाची किंमत १५ कोटी रुपये