• Download App
    मणिपूर हिंसाचाराच्या तडाख्यातून १४ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुखरूप महाराष्ट्रात आणणारा जिगरबाज शिक्षक! The brave teacher who brought 14 students safely to Maharashtra for education from the outbreak of Manipur violence

    मणिपूर हिंसाचाराच्या तडाख्यातून १४ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुखरूप महाराष्ट्रात आणणारा जिगरबाज शिक्षक!

    (संग्रहित छायाचित्र)

    विद्यार्थ्यांसोबत परतत असताना चुरचंदपूरमध्ये जमावाचा सामना करावा लागला होता, जाणून घ्या  तेव्हा नेमकं काय घडलं?

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर :  मणिपूरमधील हिंसाचारावरून अवघा देश स्तब्ध झालेला आहे. येथील चिघळलेली परिस्थिती अद्यापही  पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या हिंसाचाराने अनेकांचे बळी घेतले आहेत शिवाय मोठ्याप्रमाणावर वित्तहानी देखील झालेली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना एक सकारात्मक गोष्ट समोर आली आली आहे. सोलापूरमधील एका शिक्षकाने मणिपूरमधील १४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सुखरूप परत आणले आहे. The brave teacher who brought 14 students safely to Maharashtra for education from the outbreak of Manipur violence

    सोलापूर येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील शिक्षक अनंत आलिशे यांनी सांगितले की,“मी विद्यार्थ्यांसोबत परतत असताना चुरचंदपूरमध्ये आम्हाला जमावाचा सामना करावा लागला. त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि मी मुलांना कुठे घेऊन जातोय याची चौकशी केली. विद्यार्थ्यांनी त्यांना स्थानिक बोलीभाषेतील सांगितले की मी त्यांचा शिक्षक आहे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील त्यांच्या शाळेत परतत आहे, असे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले.”

    मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचाराने मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागरिकांचे जीवनमान विस्कळीत केले आहे. आलिशे हे यावर्षी एप्रिलमध्ये मणिपूरला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर, जेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला, तेव्हा ते पुन्हा मणिपूरला गेले आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आले जेणेकरून ते पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करू शकतील. ही शाळा दुर्गम भागातील मुलांना विशेषतः मणिपूरसह देशाच्या सीमावर्ती राज्यांमधील मुलांना शिक्षण देते.

    या उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये, आलिशे हे मणिपूरमध्ये तीन महिने राहिले आणि तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ९० दिवस घालवल्यानंतर त्यांनी स्थानिकांचा विश्वास संपादन केला व मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने आपल्यासोबत सोलापूरला आणले होते. मणिपूरमधील एकूण १४ विद्यार्थी सध्या शाळेत शिकत आहेत, एक सातव्या वर्गात, नऊ विद्यार्थी सहाव्या वर्गात आणि चार विद्यार्थी पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहेत. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, प्रोग्रामिंग आणि कोडिंग प्रोग्राम्सचे प्रशिक्षणही मिळते, असेही अलिशे म्हणाले.

    मणिपूरमध्ये जसजसा हिंसाचार सुरू झाला तसतसे त्यांचे महाराष्ट्रात परत येणे कठीण दिसत होते, कारण पालकांना त्यांना परत पाठवण्याची चिंता होती. मात्र जेव्हा अलिशे हे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी स्वत: मणिपूरला आले तेव्हा पालक मुलांना त्यांच्याबरोबर पाठवण्यास तयार झाले.

    The brave teacher who brought 14 students safely to Maharashtra for education from the outbreak of Manipur violence

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य