• Download App
    ब्राम्हण समाजाने संवैधानिक लोकशाहीच्या सक्षमतेसाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे|The Brahmin community must strive for the empowerment of constitutional democracy Gopal Tiwari's Appeal

    ब्राम्हण समाजाने संवैधानिक लोकशाहीच्या सक्षमतेसाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे गोपाळ तिवारी यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : स्वातंत्र्य पूर्व काळात स्वराज्याच्या उभारणीत ब्राम्हण समाजातील अनेक नेते पुढे आले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, काकासाहेब गाडगीळ, एस एम जोशी ते नानासाहेब गोरे आदींनी पुणे शहरा बरोबरच देश उभारणीत योगदान दिले.The Brahmin community must strive for the empowerment of constitutional democracy Gopal Tiwari’s Appeal

    मात्र देशातील सद्य स्थितीत ‘संविधानिक लोकशाहीच्या सक्षमतेसाठी व नागरी स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी’ समाजाने जागरूक व प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे,असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.



    अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र हे ब्राम्हण समाजा खेरीज, ‘इतर ही समाजातील गरजूंसाठी मदत कार्य करत असल्याची बाब विशेष अभिनंदनीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

    अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र तर्फे, आदीवासी पाड्यां मधील मुलांना कपडे वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळ (पेण) संस्थेच्या श्री. पाटील व इतर पदाधिकाऱ्यांकडे तिवारी यांच्या हस्ते हे साहित्य – सुपूर्द करण्यात आले.

    तसेच पुणे ते गोवा सहाशे किमी. मी. हे अंतर सायकलिंगने पार पाडलेल्या संदीप आटपळकर आणि अदिती देवधर यांचाही संस्थे तर्फे सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कसबा ब्लॅाक काँग्रेस अध्यक्ष शप्रवीण करपे तसेच कार्यक्रमाचे संयोजक व संस्थेचे अध्यक्ष मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, कोषाध्यक्ष सुजाता मवाळ, निता पारखी, सुवर्णा रिसबूड, माधवजी ताटके, शिरीष आठल्ये,

    अनघा जोशी, श्रीकांत जोशी, संयोगिता पागे, सौ पल्लवी गाडगीळ, मुकुंद जोशी, अनिल शिदोरे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन उल्हास पाठक व राजेंद्र देवधर यांनी केले.आभार कार्यवाह विश्वनाथ भालेराव यांनी मानले.

    The Brahmin community must strive for the empowerment of constitutional democracy Gopal Tiwari’s Appeal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!