वृत्तसंस्था
नोएडा : पाण्याच्या एका बाटलीने अभियंत्याचा जीव अपघातात गेल्याची घटना घडली आहे. भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली ही बाटली आल्याने मोटार थांबविता आली नाही. हा भीषण अपघात नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर घडला. The bottle kept in the car became the cause of death, the tragic end of the engineer in accident
अभिषेक झा, असे अभियंत्याचे नाव आहे ते दिल्लीचे रहिवासी आहेत.. ते मित्रासोबत मोटारीतून ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होते. त्यांची मोटार रस्त्याकडेल उभ्या असलेल्या ट्रकवत जाऊन आदळली. या अपघातात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला. या अपघाताचे कारण हे मोटारीतील पाण्याची बाटली असल्याचे उघड झाले.
अभिषेक हे मोटार चालवत होते. तेव्हा सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची एक बाटली सरकली आणि अभिषेक यांच्या पायाखाली आली. समोर असलेला ट्रक पाहून अभिषेक यांनी ब्रेक लावला. मात्र ब्रेकखाली बाटली असल्याने ब्रेक लागला नाही. मोटार वेगाने जाऊन ट्रकवर आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काय काळजी घ्यावी
– मोटारीत पाण्याच्या बाटल्या ठेऊ नयेत
– मोटारीत पाण्यासाठी इग्लुचा वापर करावा
– सिटमागे असलेल्या पॉकेटचा वापर करावा
– पाण्याच्या बाटलीमुळे असे अपघात घडत आहेत.
– बाटलीसह अन्य घरंगळणाऱ्या वस्तू ठेवू नयेत
– मोटारीतील अनावश्यक वस्तू तातडीने काढून टाका
– मोटारीत बसण्यापूर्वी याबाबत काळजी घ्यावी
– एक साधी चूक मोठ्या अपघाताचे कारण बनतेय.