1973 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने अमिताभ बच्चन यांना एक वेगळे ओळख दिली.
विशेष प्रतिनिधी
पुणे : शतकाचा महानायक अशी ओळख असणारे बॉलिवूडचे शहेनशहा सुपरस्टार अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट विश्वाला पडेलेलं अदभूत असं स्वप्न आहे. The blockbuster movie Janjeer celebrate it is 50 years of success…
आपल्या अभिनयाने, खास आवाजाने आणि कायमच ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही डाऊन टू अर्थ असणारे अमिताभ बच्चन हे केवळ भारतीयांसाठीच नाही, तर जगभरातल्या हजारो सिनेरसिकांच्या गळ्यातले ताईत आहेत..
आजही प्रत्येक घरातील तिन्ही पिढ्या तितक्याच आदराने अमिताभ बच्चन यांच्यावर भरभरून प्रेम करतात. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर चार दशकावून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. यश अपयशाचा खेळ खेळताना त्यांनी अनेक सुपरडुपर हिट सिनेमीही दिले. त्यांचं सिनेसृष्टीतील योगदान हे अतुलनीय आहे. शोले, सिलसिला, डॉन, शान, कालीया, जंजीर यासारख्या एकापेक्षा एक सरस सिनेमांमधील आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
अमिताभ बच्चन यांच्या करियरमध्ये सगळ्यात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे ‘जंजीर’ 1973 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने अमिताभ बच्चन यांना एक वेगळी ओळख दिली. या सिनेमातील पोलीस इन्स्पेक्टर ‘विजय’ या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. याच भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख मिळाली.
आज या सिनेमाला 50 वर्षे पूर्ण झाली असून.या सिनेमाची जादू अजूनही कमी झालेली नाही. त्यात आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण आज पासून हा सिनेमा झी फाईव्ह या ओटीपी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय.
जंजिर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण या आधी बारा सिनेमांचा अपयश त्यांना पचवावं लागलं होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत काम करण्यास कोणीही तयार नव्हतं. मात्र अभिनेते प्राण यांनी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना बॉम्बे टू गोवा हा सिनेमा बघण्याचा आग्रह केला आणि त्यातलाच एक सीन बघून अमिताभ बच्चन यांना जंजिरा चित्रपटासाठी निवडल्या गेलं.
The blockbuster movie Janjeer celebrate it is 50 years of success…
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल
- धर्माशी संबंधित राजकीय पक्षांच्या नावावर सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राकडून 4 आठवड्यांत मागवले उत्तर
- सत्तासंघर्षावर आज निकाल, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील युक्तिवाद 16 मार्चला झाला होता पूर्ण; राज्यपालांचा आदेश रद्द होणार का? वाचा सविस्तर
- बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार