वृत्तसंस्था
पुणे : सत्तेत असताना आणि आता विरोधात असताना काँग्रेससह विरोधकांनी काहीच केले नाही. ते केवळ बोलघेवडे आहेत. आम्ही मात्र, करून दाखविले असून भविष्यातही करून दाखवू, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. The BJP government works as it says; Opponents simply speak; Amit Shah
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित भाजप मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लोकांना कळले की हेच करून दाखवणारे सरकार आहे. विशेष म्हणजे आम्ही या विश्वासास पात्र ठरलो आहोत. देशहिताचे निर्णय घेताना सरकारने मागे पुढे पहिले नाही. जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण केली आहेत. घटनेचे ३७० वे कलम रद्द करणे व राममंदिर निर्मिती यांचा समावेश आहे.
राममंदिर बनवणे हा आमचा राजकीय कार्यक्रम आहे. अशी टीका होत होती. मंदिर कधीच बनणार नाही असे बोललं जात होतं. आज नरेंद्र मोदींनी मंदिराच भूमिपूजन केलं. एक भव्य मंदिर तिथे उभे राहणार आहे. देशात काँग्रेस सरकार होते तेव्हा देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त होती. सुरक्षा धोक्यात होती. मोदी आल्यावर लोकांना कळलं कि मौनी बाबाची सत्ता नाही. हे तर करून दाखवणाऱ्यांचे सरकार आहे.
काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरणार नाही. महाआघाडी सरकार म्हणजे तीन दिशांना जाणारे पंक्चर झालेले टायर आहे.ते पुढे जाता केवळ धूर सोडतात.
शाह म्हणाले, आज त्यांची तब्येत ठीक नाही. जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही महाराष्ट्रातील जनता विचारत होती की कुठे आहे सरकार? असा सवाल त्यांनी केला. मात्र, उद्धव ठाकरेंवर नाव न घेता ही टीका केली. ”स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. सरकार आमचा जन्मसिद्ध अधिकर आहे असे शिवसेना समजत आहे. आम्ही दोन हात करण्याच्या तयारीत आहोत. तिघे एकत्र या आम्ही एकटे भारी पडू, असे आव्हान त्यांनी दिले आहे.”
The BJP government works as it says; Opponents simply speak; Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ