वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मध्ये 13 लोकांची घरे पेटवून देऊन जाळून हत्या केल्यानंतर बंगाल धुमसतोच आहे. या भयानक हिंसाचाराची कोलकत्ता हायकोर्टाने दखल घेतली असून आज दुपारी 2.00 वाजता या प्रकरणावर सुनावणी ठेवली आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. The Bengal Files: After the burning of 13 people in Rampurhat, the High Court took notice after the smog in Bengal; Hearing this afternoon !!
रामपुरहाट मधून पलायन
ज्या रामपुरहाट मध्ये तृणमुल काँग्रेसचा स्थानिक नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर भादू शेखच्या समर्थकांनी 10 लोकांना घरात कोंडून जिवंत जाळून मारून टाकले. या भयानक हिंसक घटनेनंतर रामपुरहाट मधून लोक पलायन करत असून पश्चिम बंगालमध्ये अन्यत्र देखील याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हायकोर्टाने या सगळ्या प्रकाराची दखल घेतली असून ममता बॅनर्जी सरकारला आपली भूमिका ताबडतोप मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज दुपारी 2.00 वाजता रामपुरहाट जळीत कांडाची सुनावणी हायकोर्टात होणारा आहे.
भाजपचे शिष्टमंडळ रामपुरहाट मध्ये
तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एक शिष्टमंडळ रामपूरहाट दौऱ्यावर रवाना झाले आहे. खासदार अर्जुन सिंग, खासदार जगन्नाथ सरकार हे देखील शुभेंदू अधिकारी यांच्याबरोबर या दौर्यात समाविष्ट आहेत. ही शिष्टमंडळ रामपुरहाट मधून होणारे पलायन रोखण्याचा प्रयत्न करेल तसेच पीडितांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल.
राष्ट्रपती राजवटीची मागणी
पश्चिम बंगालमध्ये हा भडका हिंसाचार लक्षात घेऊन काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. दुपारी 2.00 वाजता हायकोर्टात सुनावणी होत आहे. या सुनावणीत नेमके काय होणार आणि कोलकत्ता हायकोर्ट पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला कोणते आदेश देणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
The Bengal Files: After the burning of 13 people in Rampurhat, the High Court took notice after the smog in Bengal; Hearing this afternoon !!
महत्त्वाच्या बातम्या
- दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात
- ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??