• Download App
    अटल टनेल जगातील सर्वात लांब बोगदा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली नोंद|The Atal Tunnel is the longest tunnel in the world, recorded in the World Book of Records

    अटल टनेल जगातील सर्वात लांब बोगदा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली नोंद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये उभारलेल्या अटल टनेलला जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून मान मिळाला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा अशी अटल टनेलची नोंद झाली आहे.The Atal Tunnel is the longest tunnel in the world, recorded in the World Book of Records

    केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटवर माहिती देताना म्हटले आहे की अटल टनेलला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून प्रमाणित केले आहे. हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असलेल्या अभियांत्रिकी चमत्काराने आपल्या सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये एक नवीन आयाम जोडला आहे.



    हिमालयाच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये हिमवृष्टी झाल्यावर हिमाचल प्रदेशातील अनेक भागांचा संपर्क देशापासून तुटतो. मुख्य म्हणजे चीन सीमेवरील सैनिकांना रसद पुरविणे अवघड होते. मात्र, अटल टनेलमुळे आता हे रस्ते वर्षभर सुरू राहणार आहेत. हिमालयाचे दुर्गम पर्वरांगांमधील पहाड खोदून निर्माण करण्यात आलेला हा बोगदा ३,०६० मीटर उंचीवर आहे. हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे देशापासून संपर्क तुटणारे सर्व भाग संपूर्ण वर्षभर जोडले जाणार आहेत.

    या बोगद्यामुळे मनाली आणि लेहचे अंतर कमी होणार आहे. आता रोहतंग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी ४७४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. अटल बोगद्यामुळे हे अंतर ४२८ किलोमीटर इतके राहणार आहे. या बोगद्यामध्ये कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

    या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे. लेह-लडाखमधील शेतकरी, मजूर आणि युवकांना आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या टनेलमुळे आता मनाली आणि केलांगमधील अंतर ३ ते ४ तासांनी कमी होणार आहे.

    या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. ९.०२ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे. या पूर्वी हिमवषावार्मुळे या खोºयाचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा. मनाली-लेह महामार्गावर रोहतंग, बारालचा, लुंगालाचा ला आणि टालंग ला असे पास आहेत. या भागात मोठी बर्फवृष्टी होत

    असल्यामुळे हिवाळ्यात येथे पोहोचणे अतिशय कठीण असते. या पूर्वी मनालीहून सिस्सूला पोहोचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात, आता हे अंतर केवळ एका तासात पार होणार आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तयार केला आहे.

    अटल बोगद्यात ४०० मीटरसाठी वेगमयार्दा ताशी ४० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित अंतरासाठी गाडी ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही टोकांवर एंट्री बॅरियर्स लावण्यात येणार आहेत. दर १५० किमीवर एमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी टेलिफोन कनेक्शन बसवण्यात आलेले आहे.

    दर ६० मीटरपर्यंत फायर हायड्रेंट मॅकॅनिझम उपलब्ध आहे. आग लागल्यास कमीत कमी वेळात आगीवर नियंत्रण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. दर २५० मीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे असलेले ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टम उपलब्ध आहे. दर किलोमीटरच्या अंतरावर हवेचे मॉनिटरिंग देखील होणार आहे. दर २५ मीटरवर एग्झिट आणि इव्हॅक्युशनच्या खुणाही दिसणार आहेत. संपूर्ण बोगद्यासाठी एक ब्रॉडकास्टिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे.

    The Atal Tunnel is the longest tunnel in the world, recorded in the World Book of Records

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान मोठी दुर्घटना टळली

    Election Commission : निवडणूक आयोगाने एकाच वेळी घेतले तीन निर्णय!

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी केरळमधून ८९०० कोटी खर्चून बांधलेल्या विझिंजम बंदराची दिली भेट