या घटनेचा तपास करण्यासाठी गृहमंत्रालयाकडून ‘SIT’ स्थापन करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: संसद भवनात मोठ्या प्रमाणात सुरक्षा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांवर दहशतवाद विरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.The Anti Terrorism Act was imposed against those who infiltrated the Parliament House
संसद भवनात घुसखोरी करणाऱ्या तरूणांनी बुटामध्ये लपवून स्मोक कँडल आणल्या होत्या. फवारणी होताच सभागृहात पिवळा धूर पसरू लागला. यानंतर खासदारांनी त्या तरुणांना पकडून बेदम चोप दिला.
सहा आरोपींमध्ये सागर शर्मा आणि डी मनोरंजन यांचा समावेश आहे, ज्यांनी लोकसभेत पिवळ्या धुराचे स्मोक कँडल पेटवले होते. त्याचवेळी नीलम देवी आणि अमोल शिंदे यांनी संसदेबाहेर लाल आणि पिवळ्या रंगाच्या कँडलमधून धूर सोडला होता.
अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये ललित झा आणि विकी शर्मा हे दोघेही गुडगावचे रहिवासी आहेत. ललित झा यांनी कथितरित्या एक व्हिडिओ शूट केला होता ज्यामध्ये इतर आरोपी बुटात स्मोक कँडल्स लपवत होते. हाच व्यक्ती सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेला. विकी शर्माने इतर आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप आहे.
The Anti Terrorism Act was imposed against those who infiltrated the Parliament House
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!