• Download App
    भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन The ancestor of Hindus and Muslims living in India is the same, asserted Sarsanghchalak Mohan Bhagwat

    भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.भारतात इस्लाम हा आक्रमकांच्या सोबतच आला. हाच इतिहास आहे व तसेच सांगणे गरजेचे आहे, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. The ancestor of Hindus and Muslims living in India is the same, asserted Sarsanghchalak Mohan Bhagwat

    ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र सर्वप्रथम राष्ट्र सर्वोतोपरी’ या व्याख्यानात ते बोलत होते. मुस्लिम समाजातील समजूतदार नेतृत्वाने आततायी विचारांचा विरोध करणे गरजेचे आहे. त्यांना धमार्तील कट्टरपंथीयांसमोर ठोस भूमिका घ्यावी लागेल, असे आवाहन करून भागवत म्हणाले हे काम दीर्घकालीन प्रयत्न, तसेच प्रचंड हिंमतीसह करायला हवे.



    आपल्या सगळ्यांची परीक्षा खूप मोठी व खडतर आहे. आपण जितकी लवकर सुरुवात करू, तितके समाजाचे नुकसान कमी होईल. भारत महाशक्ती बनेल तर ते कुणाला घाबरवण्यासाठी नसेल, तर तो विश्वगुरू म्हणून महाशक्ती बनेल. युगानयुगे आम्ही सजीव आणि निर्जीव सर्वांच्याच उत्थानासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे भारत महाशक्ती होण्याची कोणालाही भीती वाटण्याची गरज नाही.

    भागवत म्हणाले, आमच्या दृष्टीने हिंदू हा मातृभूमी, पूर्वज, तसेच भारतीय संस्कृतीचा वारसा याचा प्रतिशब्द आहे. हिंदू हे कुठलेही जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नसून, जगातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, उत्थान आणि मार्गदर्शन करणाºया परंपरेचे नाव आहे. हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धमार्तील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो. दुसºया मतांचा इथे अनादर होणार नाही. मात्र मुस्लिम वर्चस्वाचा नाही, तर भारताच्या वर्चस्वाचाच विचार करणे महत्त्वाचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल.

    जगातील ज्या-ज्या ठिकाणाहून वैविध्य नष्ट झाले तिथे वाईट गोष्टींचा जन्म झाला. जगात जिथे वैविध्य आहे, तिथे तिथे संपन्नता आहे. भारतीय संस्कृतीत कुणालाच परके मानले जात नाही, कारण या संस्कृतीतच सगळे समान आहेत, असे मत अरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

    पाकिस्तानने १९७१ नंतर भारताला रक्तरंजित करण्याचे एक कारस्थान रचले. भारत सरकार, सेना, पोलिस यांनी हे कारस्थान गेल्या ३० वर्षांत उद्?ध्वस्त केले. परंतु बदलत्या परिस्थितीत पाकिस्तानकडून भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता असून भारतीय मुस्लिम बुद्धिवाद्यांनी याबाबत सतर्क राहायला हवे, असे आवाहन सय्यद अटा हुसेन यांनी व्यक्त केले.

    The ancestor of Hindus and Muslims living in India is the same, asserted Sarsanghchalak Mohan Bhagwat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!