विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष, पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!, हे काँग्रेसमध्ये घडेल हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर काँग्रेसच्याच एका अत्यंत वरिष्ठ नेत्याने सांगून टाकले. The acts of Congress’s Adhir Ranjan Chowdhury are nothing less than political extortion.
राहुल गांधींनी गेल्या 5 वर्षांमध्ये सतत भारतातल्या उद्योगपतींना धारेवर धरताना अदानी आणि अंबानी यांच्यावर शरसंधान साधले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातही राहुल गांधी अदानी आणि अंबानींना बिलकुल सोडत नाही त्यांच्या निमित्ताने ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ठोकून काढतात.
पण एकीकडे राहुल गांधी असे सगळे करत असले तरी त्यांचे नेते मात्र अदानी आणि अंबानी यांच्याकडे आशाळभूतपणे पाहून ते पैसे कधी देतात याची वाट पाहत आहेत. काँग्रेसचे गेल्या लोकसभेतले गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका मुलाखतीत काँग्रेसचे हे रहस्य खोलून टाकले. संसदेत आम्ही अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात बोललो. कारण त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी पैसे पाठवले की आम्ही गप्प बसू, असे अधीर रंजन चौधरी उघडपणे म्हणाले. त्यावर त्यांना प्रश्न विचारणारा अँकर खळखळून हसला. पण अधीर रंजन चौधरींनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही. उलट त्याच्या हास्यात आपले हास्य मिसळून “पहले पैसे तो भेजे, बाद विचार करेंगे!!”, असे उत्तर देऊन काँग्रेस अदानी + अंबानीं कडून पैसे घ्यायला किती उतावळी झाली आहे, हेच सांगून टाकले.
अधीर रंजन चौधरी यांच्या या मुलाखतीमुळे भाजपला काँग्रेस आणि राहुल गांधींना ठोकून काढण्याची संधी मिळाली. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अधीर रंजन बाबूंच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करून टाकला. त्यात त्यांनी राहुल गांधींना, तर घेरलेच पण आदानी अंबानी विरोधात लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना देखील टोले हाणले.
परंतु आपला हा इंटरव्यू अंगलट आल्याचे बघून अधिर रंजन चौधरी यांनी घुमजाव केले. आपण केवळ गंमतीने ते बोललो. भाजपच्या नेत्यांना त्यातली गंमत कळली नाही, अशी सारवासारव अधीर रंजन बाबूंनी केली
The acts of Congress’s Adhir Ranjan Chowdhury are nothing less than political extortion.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी ‘रामद्रोही’ राजकारण करतात’ ; मुख्यमंत्री योगींचा ‘सपा’वर निशाणा!
- ‘ओडिशातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगा’ ; मोदींचे नवीन पटनायक यांना आव्हान!
- ‘दारूचा प्रभाव आहे की तिहार…’ ; भाजपने लगावला केजरीवालांना टोला!
- पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार