प्रतिनिधी
नवी दिल्ली : अहमदाबाद बाँबस्फोटातील 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या सर्व आरोपींची कनेक्शन्स कुठे होती?, याची जोरदार चर्चा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत होताना दिसत आहे. यातले अनेक आरोपी आझमगड परिसरातले आहेत आणि त्यांचे कुठे ना कुठे तरी समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी संबंध आहेत, अशी राजकीय तसेच तसेच सोशल मीडिया देखील चर्चा आहे.The accused in the Ahmedabad bomb blast are linked to the Samajwadi Party in Azamgarh
अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद सैफ हा समाजवादी पक्षाचे नेते शादाब अहमद उर्फ मिस्टर यांचा मुलगा आहे आणि तो इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये बंद आहे. त्याचबरोबर मोहम्मद सैफचा भाऊ डॉ. शहानवाज आलम हा दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी आहे आणि सध्या तो फरार असल्याने त्याच्याविरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने 10 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आझमगड, पीलीभीत, सीतापूर, लखनऊ या दौऱ्यामध्ये अहमदाबाद बाँबस्फोट आणि त्यातील आरोपींचा वारंवार उल्लेख केला. समाजवादी पक्षाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्या तारा जोडल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी अखिलेश यादव आणि शादाब अहमद उर्फ मिस्टर या दोघांचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
The accused in the Ahmedabad bomb blast are linked to the Samajwadi Party in Azamgarh
महत्त्वाच्या बातम्या