• Download App
    गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाला चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट; शामक अग्रवाल बनला सुरतचा सर्वात तरुण डॉक्टरेट|The 16-year-old boy of Surat has earned an honorary doctorate from a Delhi University college with his achievements in the field of art.

    गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाला चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट; शामक अग्रवाल बनला सुरतचा सर्वात तरुण डॉक्टरेट

    वृत्तसंस्था

    सुरत : गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाने चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट मिळवली आहे. शामक अग्रवाल, असे त्याचे नाव आहे.The 16-year-old boy of Surat has earned an honorary doctorate from a Delhi University college with his achievements in the field of art.

    शामक अग्रवाल हा गुजरातमधील सुरत येथील वेसू परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयातून ही मानद डॉक्टरेट मिळवली आहे.शामक गेली नऊ वर्षे चित्रकलेचा सराव करत आहे. आतापर्यंत त्याने विविध चित्रांची निर्मिती केली आहे.



    त्याच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा झाली आहे. एप्रिल २०२१मध्ये शामकने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. तेव्हापासून, तो वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यूके, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये समाविष्ट झाला आहे.

    विशेष म्हणजे शामक अग्रवाल याला २०२१ मध्ये बाल रत्न पुरस्कार प्रदान केला आहे. दुसरीकडे, दिल्लीच्या अल्फस राज्य शासकीय विद्यापीठाने त्याला कला विद्याशाखेत मानद डॉक्टरेट प्रदान केली.
    शामकने सर्वात जलद रेखाचित्र, स्केचेस तसेच इतर नऊ विक्रम केले आहेत. आता, तो सुरतचा सर्वात तरुण डॉक्टरेट विद्यार्थी बनला आहे.

    शामक म्हणाला, इयत्ता दुसरीमध्ये कलेमध्ये खूप रस निर्माण झाला. परंतु शाळेने त्याकडे दुर्लक्ष केले. तथापि, पालकांनी मनोबल वाढवले. माझ्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि प्राचार्य यांनाच जाते.
    शामकचे वडील विकास अग्रवाल म्हणाले की, मेहनत आणि समर्पणाने काहीही शक्य होते,

    हे त्याने जगाला दाखवून दिले आहे. शामक हा विज्ञानाचा विद्यार्थी असला तरी त्याने कला क्षेत्रात केलेली कामगिरी मोठी आहे आणि डॉक्टरेट मिळवली आहे. ही बाब तर कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची अशीच आहे.मुलाला लहान वयात मोठी पदवी मिळल्याबद्दल आई पल्लवी यांचा आनंद तर गगनात मावला नाही.

    The 16-year-old boy of Surat has earned an honorary doctorate from a Delhi University college with his achievements in the field of art.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका