विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आयपीएल मध्ये हजारो कोटींचा घोटाळा आणि कर चोरी करून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या ललित मोदींचे राहुल गांधींशी खानदानी संबंध आहेत. ललित मोदींनी आपले आजोबा रायबहादूर गुजरमल मोदी यांचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंबरोबरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. इतकेच नाही तर नेहरूंबरोबरचे अन्य काँग्रेस नेत्यांचे देखील गुजरमल मोदी आणि त्यांच्या पत्नी दयावती मोदी यांचे फोटो ललित मोदींनी ट्विट केले आहेत. thats my grandfather and grandmother they dedicated thier lives to the poor.
रायबहादुर गुजरमल मोदी हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातले मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक होते. साखर कारखान्यांपासून रसायन कारखाने व अन्य उद्योगांमध्ये त्यांच्या मोठ्या गुंतवणूकी होत्या. इंग्रजांनी त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. काय बहादूर गुजरमल मोदी यांनी मोदीनगर हे औद्योगिक नगर स्थापन केले. याच मोदी नगर मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. त्यावेळी गुजरमल मोदी आणि नेहरू एकमेकांशी चर्चा करतानाचा फोटो ललित मोदींनी शेअर केला आहे. आपला जन्म याच मोदी नगर मध्ये झाल्याचे ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
त्याचबरोबर माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांच्याबरोबर दयावती मोदी यांचे फोटो देखील ललित मोदींनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
मात्र, ललित मोदींच्या या कृतीमुळे काँग्रेस नेते संतप्त झाले असून मोदी खानदान कितीही मोठे असले तरी ललित मोदी हे घोटाळा करून पळून गेलेले गुन्हेगार आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
राहुल गांधींनी देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्यानंतर त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली. राहुल गांधींनी माफी मागितली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ललित मोदींनी राहुल गांधींना आपली बदनामी केल्याच्या निषेधार्थ लंडनच्या कोर्टात खेचण्याची धमकी दिली होती. या राजकीय पार्श्वभूमीवर ललित मोदींनी आपल्या खानदानाचे नेहरू गांधीगंधांना बरोबर कसे संबंध होते या संदर्भात फोटो ट्विट केले आहेत. पण त्यामुळे आता काँग्रेस संतप्त झाली आहे.
thats my grandfather and grandmother they dedicated thier lives to the poor.
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेने रशियामध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना तत्काळ देश सोडण्याचे केले आवाहन
- अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार!
- पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला अचानक भेट, बांधकाम कामगारांशी केली चर्चा
- ‘मी फरार नाही, मी बंडखोर आहे… मी लवकरच समोर येईन’, अमृतपालने जारी केला नवा व्हिडिओ