• Download App
    राज्यात ठाकरे- पवार सरकारमधील चार मंत्र्यांचे निकटवर्तीय इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर; राज्यात विविध ४० ठिकाणी सुद्धा टाकले छापे Thackeray-Pawar government Four ministers nearest persons on the radar of the Income Tax Department; Raids on 40 places in state also

    राज्यात ठाकरे- पवार सरकारमधील चार मंत्र्यांचे निकटवर्तीय इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर; राज्यात विविध ४० ठिकाणी सुद्धा टाकले छापे

    वृत्तसंस्था

    मुंबई: राज्यातील ठाकरे- पवार सरकारमधील चार मंत्र्यांचे निकटवर्तीय इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले असून विभागाने त्यांच्यावर आज छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. विभागाने राज्यात विविध ४० ठिकाणी बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यक्तींवर सुद्धा टाकले छापेमारी केल्याचे वृत्त आहे.  Thackeray-Pawar government Four ministers nearest persons on the radar of the Income Tax Department; Raids on 40 places in state also

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बड्या नेत्यांवर सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) कारवाई सुरु असताना आता ईडीनंतर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

    राज्यात इन्कम टॅक्स विभागाकडून ठिकठिकाणी छापे टाकले जाता आहेत. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयांवर आणि घरी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे ठाणे आणि मुंबई या शहरातील काही ठिकाणी छापे टाकले. यामध्ये काही दिग्गज नेत्यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे.

    महाविकास आघाडीतील बडे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. पुण्यात विकासक जयंत शाह आणि मुंबईत प्रशांत निलावार यांच्यावर छापे टाकले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सुदच्या काही मालमत्तांवर देखील छापे टाकले होते.

    राज्यात ४० ठिकाणी टाकले छापे

    पुण्यातील उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात ४० ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाने मुंबई, पुणे, जालना, यवतमाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये बांधकाम व्यवसायिकांची झाडाझडती सुरू केली आहे.
    गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने छापा टाकला होता. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सुरू असतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने धडक कारवाई केली. यावेळी स्थायीची बैठकीला अनेक ठेकेदारही उपस्थित होते. यानंतर स्थायीच्या १५ सदस्यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

    Thackeray-Pawar government Four ministers nearest persons on the radar of the Income Tax Department; Raids on 40 places in state also

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!