हरियाणात ज्याप्रमाणे भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेसच्या हातात आलेली बाजी केवळ स्वतःच्या हट्टापायी गमावली, तशीच भूमिका महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बजावत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे “भूपेंद्र सिंग हुड्डा” बनत चालले आहेत.
हरियाणा मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. पक्षाने भाजपची चांगली टक्कर देत 10 पैकी 5 जागा मिळवल्या. त्यामुळे काँग्रेसचा हुरूप वाढला. विधानसभा निवडणुकीत आपण भाजपवर मात करू, अशी जिद्द सगळ्या नेत्यांनी बाळगली, पण काँग्रेस हायकमांडने फक्त भूपेंद्र सिंग हुड्डा या 78 वर्षांच्या वयोवृद्ध नेत्यावर विश्वास ठेवला. हुड्डा यांनी देखील भावी मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक बेरजेचे राजकारण करण्याऐवजी आपल्याच गटाचे राजकारण मजबूत करायचा प्रयत्न केला. काँग्रेसची जास्तीत जास्त तिकिटे आपल्या गटातल्या लोकांना मिळतील, याची “व्यवस्था” केली त्यांनी दलित नेत्या कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला यांना बाजूला सारले, इतकेच काय पण स्वतःचा मुलगा दिपेंद्र सिंग हुड्डा याला देखील फारसे डोके वर काढू दिले नाही.
काँग्रेस हायकमांडला या सगळ्या गोष्टीची कल्पना आली. किंबहुना कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला यांनी जाहीरपणे तसे बोलून दाखविले. काँग्रेस हायकमांड कडे अनेक वेळा तक्रारी करून हरियाणातील खरी परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु हायकमांडने भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावरच अतिरिक्त विश्वास ठेवला. त्यांची राजकीय मनमानी हरियाणा चालू दिली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भूपेंद्र सिंग हुड्डांनी हरियाणा मध्ये वजाबाकीचे राजकारण केले. जाटांचे जात वर्चस्व पुन्हा निर्माण करायच्या नादात दलित + ओबीसी मतांच्या टक्केवारीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला. काँग्रेसच्या हातात आलेली बाजी भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या हट्टापायी गमवावी लागली.
महाराष्ट्रात देखील तसेच चित्र दिसायला सुरवात झाली आहे. काँग्रेसचा कुठला नेता नव्हे, उद्धव ठाकरे हे “भूपेंद्र सिंग हुड्डा” ठरत चालले आहेत. ठाकरे यांनी हुड्डा यांच्या भूमिकेत शिरून महाविकास आघाडीत जागावाटप आणि मुख्यमंत्री पदावरून ताणून धरले आहे. वास्तविक महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात केल्याचा मोठा एडव्हांटेज मिळाला. 48 पैकी 31 जागांवर विजय मिळाला, पण महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फक्त 0.31 % फरक राहिला. नेमका हाच मुद्दा महाविकास आघाडीचे घटक पक्ष विसरत आहेत आणि म्हणूनच ते लोकसभा निवडणुकीतल्या एडव्हांटेजचा फायदा घेण्याऐवजी जागावाटपाचा घोळ घालत बसले आहेत.
छोट्या पक्षांची वजाबाकी
महाविकास आघाडीतल्या बड्यांचेच ठरत नाही. त्यामुळे छोट्यांना कोणी विचारत नाही म्हणून शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड हे छोटे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या मतांच्या टक्केवारीचा फरक या छोट्या पक्षांनी केलेल्या मदतीमुळेच पडला होता, हे महाविकास आघाडीचे मोठे घटक पक्ष विसरले आहेत. म्हणूनच एकमेकांची खेचायच्या राजकारणात महाविकास आघाडीतले मोठे पक्ष वजाबाकीचे राजकारण करत चालले आहेत, जे भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी स्वतःच्या हट्टापायी हरियाणात वजाबाकीचे राजकारण केले, तेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत करत पुढे चालले आहेत.
Uddhav thackeray became obstacle in MVA like bhupendra Singh huda in haryana
महत्वाच्या बातम्या
- yashomati Thakur : मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेसने शिवसेनेला धरले ताणून; पण काँग्रेसच्या विदर्भातल्या महिला नेत्याने दिला उद्धव ठाकरेंनाच
- Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
- Delhi Police : रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई!
- Elon Musk : एलन मस्क म्हणाले- EVM मुळे निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा दिला सल्ला