• Download App
    उपराष्ट्रपती निवडणूक : ठाकरे गट शोधतोय पवारांपासून वेगळा होण्याचा मार्ग; ठाकरे गटाच्या फक्त 3 खासदारांचे मतदान!! Thackeray faction looking for way to separate from Pawar; Only 3 MPs of Thackeray group voted!!

    उपराष्ट्रपती निवडणूक : ठाकरे गट शोधतोय पवारांपासून वेगळा होण्याचा मार्ग; ठाकरे गटाच्या फक्त 3 खासदारांचे मतदान!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी दांडी मारल्याची बातमी टीव्ही 9 मराठी ने दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी आणि ओमराजे निंबाळकर यांनीच फक्त मतदानात सहभाग नोंदवला. Thackeray faction looking for way to separate from Pawar; Only 3 MPs of Thackeray group voted!!

    विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे आणि संजय जाधव हे खासदार मतदानाला पोचली नसल्याचे बातमीत नमूद केले आहे. यामुळे आधीच खासदारांच्या संख्येच्या बाबतीत रोडावलेला ठाकरे गट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर राजकीय दृष्ट्या आणखी रोडावतो की काय?, अशी शंका निर्माण झाली आहे.

    कारण शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांना मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ठाकरे गटाच्या 7 पैकी 3 खासदारांनी मतदान केल्याने ठाकरे गटाची खासदार संख्या आणखी कमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    याचा अर्थ शिवसेनेचा ठाकरे गट देखील आता बाकीच्या विरोधी पक्षांच्या विशेषतः शरद पवारांच्या पासून दूर चालल्याचे राजकीय चित्र दिसत आहे. या संदर्भात अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदानाला फक्त 3 खासदार उपस्थित राहणे यातून ठाकरे गटात वेगवेगळे राजकीय संकेत मिळत आहेत ही बाब विसरून चालणार नाही.

    Thackeray faction looking for way to separate from Pawar; Only 3 MPs of Thackeray group voted!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड