प्रतिनिधी
मुंबई : आपले राज्य आले आहे. शिंदे आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो, पण त्यांना बांधील करू शकत नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली. तसेच आम्हाला विश्वास आहे की, साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. 1-2 सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला. Thackeray and Shinde will come together to support Draupadi Murmu
शिवसेना खासदारांकडून द्रौपदी मुर्मूंचे समर्थन
सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाहीत. मन दुखवण्याचे प्रकार सोडून द्यावे. सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, की शिवसेनेने काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. नगरपंचायंचीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचा पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीकास्त्र केसरकरांनी सोडले.
मला कळले की आज खासदारांची बैठक झाली. त्यात द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचे ठरले आहे. ही आनंदाची बातमी आहे. आम्ही कुणीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलणार नाही आणि इतर कुणीही प्रतिक्रिया देवू नये, अशी आमची भूमिका आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर कोणी लोक बोलले तर आम्ही काहीच बोलणार नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षालाही सांगितले आहे की त्यांनी ही बोलू नये, असा इशाराही केसरकरांनी सोमय्यांचे नाव न घेता दिला.
Thackeray and Shinde will come together to support Draupadi Murmu
महत्वाच्या बातम्या
- शिंदे फडणवीस सरकारचे आज ठरणार भवितव्य??; पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर??; झिरवाळांच्या उत्तराचा काय परिणाम??
- गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!
- शिंदे फडणवीस सरकारचे उद्या ठरणार भवितव्य; पण सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार??
- संपूर्ण भारत वर्षावर कालीमातेच्या आशीर्वादाची कायमच पाखर!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन