विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला या अमेरिकन कंपनीचे मालक एलन मस्क यांना चांगलेच सुनावले आहे. टेस्लाला भारतात आपल्या कार निर्माण करण्यास अनेकदा सांगितले आहे. सरकारकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहेTesla’s Alan Musk well advised by Nitin Gadkari, Chinese cars will not run, suggests production of electric cars in India
. मात्र, अद्याप त्यांनी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन सुरु केलेले नाही, अशी नाराजी व्यक्त करत गडकरी यांनी म्हटले आहे की, चीनमध्ये बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतामध्ये विकू नका. तुम्ही भारतात इलेक्ट्रिक कार तयार कराव्यात आणि त्यांची निर्यातही केली पाहिजे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, तुम्हाला (टेस्ला) जे काही समर्थन हवे आहे ते आमच्या सरकारकडून पुरवले जाईल. टेस्लाने चीनमध्ये बनविलेल्या इलेक्ट्रीक कार भारतात विकू नयेत. टेस्लाने भारतात इलेक्ट्रीक कारचे उत्पादन करायला हवे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या कारची बाहेरच्या देशांना निर्यातही करावी.
गडकरी यांनी स्वदेशी कंपनी टाटाची स्तुती केली. टाटा मोटर्सच्या कार या काही टेस्लाच्या कारपेक्षा कमी नाहीत. चांगल्या कार आहेत. टेस्लाला जी काही मदत लागेल ती सरकार देईल. कंपनीच्या कराच्या बाबतीतील तक्रारीवर देखील टेस्लाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे.
गाड्यांच्या स्पीड लिमिटवर गडकरी म्हणाले, भारतातील वाहनांच्या वेग मर्यादेचे मापदंड, हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. कारच्या वेगासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. आज देशात असे एक्सप्रेस वे तयार झाले आहेत, ज्यांवर कुत्राही येऊ शकत नाही.
कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यामुळे, आता आम्ही प्लॅन केला आहे की, संसदेत गेलो की विधेयक बनवून सर्व मापदंड बदलून टाकायचे. कारची गती वाढली की अपघात होईल, अशी एक मानसिकता तयार झाली आहे. या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे.
यासाठी आम्ही फाईल तयार करत आहोत. यात, एक्स्प्रेस वेपासून महामार्ग, शहरे आणि जिल्ह्यांच्या रस्त्यांपर्यंत गती मर्यादा तयार केली जात आहे. लोकशाहीत आपल्याला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना निर्णय देण्याचा अधिकार आहे
यापूर्वी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. एलन मस्क म्हणाले होते की भारतात आयात शुल्क खूप जास्त आहे. आम्हाला इलेक्ट्रिक कार भारतात आणायची आहे, पण इथले आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा जास्त आहे!ह् असे मस्क यांनी म्हटले होते.
सध्या, भारतात ४०,००० डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या पूर्णपणे आयात केलेल्या कारवर (किंमत, विमा आणि मालवाहतूक) सह १०० टक्के आयात शुल्क आकारले जाते. यापेक्षा कमी किमतीच्या कारवर आयात शुल्क ६० टक्के दराने आकारले जाते.
देशात विकल्या जाणाºया बहुतेक कारची किंमत २०,००० डॉलरपेक्षा कमी आहे. यामध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही किरकोळ आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची कार बाजारपेठ आहे ज्यात वार्षिक ३० लाख वाहनांची विक्री होते.
Tesla’s Alan Musk well advised by Nitin Gadkari, Chinese cars will not run, suggests production of electric cars in India
महत्त्वाच्या बातम्या
- विमानतळ सुरू होताना वडलांच्या आठवणीने नारायण राणे हेलावले, संघर्ष यशस्वी होत असल्याने केली कृतार्थता व्यक्त
- चिपी विमानतळाच्या उभारणीत संबंध नसलेले बेगानी शादी मे अब्दुला दिवाना नाचत आहेत, नारायण राणे यांचा आरोप
- ओळख नवदुर्गांची : ९ ऑक्टोबर- तृतीया-चतुर्थी, देवी चंद्रघंटा आणि कूष्मांडाची पूजा, अशी आहे पौराणिक आख्यायिका, आजचा रंग – करडा
- जेव्हा मी 15 वर्षांची होते तेव्हा दिव्या भारती सोबत पॉट ट्राय केले होते : सोमी अली