विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ भारतात आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करणार का? यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. या संदर्भात टेस्लाचे अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात बंद दरवाजाआड बैठक झाली आहे. नीती आयोगाने टेसला कंपनीला भारतात येऊन कार उत्पादन करण्याचे आवाहन केले आहे. जर भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू झाले तर अपेक्षित कर कपात ही मिळेल असे आश्वासन नीती आयोगाने यावेळी दिले आहेत.
Tesla electric car manufacturing company to launch in India?
याआधी टेस्लाचे कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारतात आयात कर अधिक असल्याचे एका ट्वीटद्वारे सांगितले होते. टेसला इलेक्ट्रिक वाहनांवरील कर 40 टक्के करण्याची आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील 10 टक्के सामाजिक उत्तरदायित्व कर हटवण्याची मागणी टेस्टला कंपनीकडून करण्यात आली होती. असे केल्याने इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होऊन त्यांची विक्री वाढू शकते. असा युक्तिवाद टेस्ला कंपनीकडून केला गेला होता. याद्वारे भारतामध्ये एक उत्कृष्ट बाजारपेठ तयार करू हा युक्तिवाद देखील टेक्सला कंपनीने दिला होता.
या युक्तिवादानंतर आज झालेल्या चर्चेनंतर राजीव कुमार यांनी टेस्लाला इलेक्ट्रिक वाहनं बाहेरील इतर देशांमध्ये निर्माण करून इथे भारतात निर्यात करण्याचा मार्ग अवलंबू नये अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटले आहे की, टेस्ला कंपनीने भारतात येऊन इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करावे. जेणेकरून भारतीयांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि असे केल्यास तुम्हाला कर कपात देखील मिळेल. असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. आज झालेल्या बैठकीनंतर सरकार 100 टक्के करावरून 60 टक्के वर येण्याच्या तयारीत असल्याचंही यावेळी बोललं जातंय.
इलॉन मस्क यांनी कपातीची मागणी केल्यानंतर भारतातील कार उत्पादक कंपन्यांमध्येही या विषयावर मोठमोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मर्सिडीज, हुंदाई, टाटा मोटर्स आणि ओला इलेक्ट्रिकल ने देखील कर कपातीचा मागणीला पाठींबा दर्शवला आहे.
Tesla electric car manufacturing company to launch in India?
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
- चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
- महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
- ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- ‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल